MP Ramrao Wadkute passes away: हिंगोली जिल्ह्याचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

राज्यसभेचे खासदार आणि परभणी-हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले रामराव वडकुते यांचे आज पहाटे दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
MP Ramrao Wadkute passes away
MP Ramrao Wadkute passes awayFile Photo
Published on: 
Updated on: 

MP Ramrao Wadkute passes away

हिंगोली: राज्यसभेचे खासदार आणि परभणी-हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले रामराव वडकुते यांचे आज पहाटे दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते दिल्ली येथे असताना रात्री एकच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रामराव वडकुते हे हिंगोली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात पक्ष संघटना बांधणी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळेच पक्षाने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते.

MP Ramrao Wadkute passes away
Hingoli medical college CT scan closed | वैद्यकीय महाविद्यालयातील सीटीस्कॅन यंत्रणा बंद

आज दिल्ली येथून रामराव वडकुते यांचे पार्थिव परभणी येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती वडकुते कुटुंबीयांनी दिली आहे.

वडकूते हे चार दिवसांपूर्वीच काही कामानिमित्त लखनौला गेले होते. तेथून ते शुक्रवारी रात्री नवी दिल्लीत परतले होते. निवासस्थानी मुक्कामी असताना दम लागू लागल्याने ते अस्वस्थ झाले. शनिवारी सकाळी ते मित्रासह नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत वडकुते यांची प्रकृती स्थिर होती. परंतु रात्री उशिरा उपचार सुरू असताना प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. उपचार सुरू असताना निधन झाले. दरम्यान कुटुंबीयांना याबाबत समजताच मोठा धक्का बसला आहे. त्यांचे बंधू दिलीपराव वडकुते व अन्य काही मित्र तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

MP Ramrao Wadkute passes away
Hingoli News: आकोलीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; हप्ता बंद झाल्याने कारवाई झाली का? गावकऱ्यांचा सवाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.