Parbhani news |खा. वडकुते यांचा सत्कार; राजकीय जुगलबंदी रंगली

परभणी : खा. संजय जाधव यांच्या पक्ष प्रवेशाची येथेही चर्चा
Parbhani
परभणी : खा. रामराव वडकुते यांच्या नागरी सत्काराप्रसंगी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खा. संजय जाधव, माजी आ. सुरेश वरपुडकर, मा.आ. सुरेश देशमुख, स्वराजसिंह परिहार, कॉ. कीर्तीकुमार बुरांडे, विठ्ठल रबदडे, भगवान वाघमारे, नानासाहेब राऊत आदी.pudhari photo
Published on
Updated on

परभणी : रविवारी शहरातील एमआयडीसी परिसरातील हॉटेल हॉलिडे फन पार्क येथे राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल खा. रामराव वडकुते यांचा नागरी सत्कार पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर हे होते. पालकमंत्री मेघना साकोरे बोडॉकर यांच्या हस्ते खा. रामराव वडकुते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास खा. संजय जाधव, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, नानासाहेब राऊत, डॉ. विवेक नावंदर व मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना माजी. आ. सुरेश देशमुख यांनी आपल्या भाषणातून जोरदार राजकीय टोलेबाजी केली. परभणी भूकंप झाला का? असा सवाल करत खा. संजय जाधव यांच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात भाष्य करत खासदार साहेब मंत्री व्हावेत, अशी आमची मनोमन इच्छा आहे, असे सुरेश देशमुख म्हणाले.

महानगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जोरदार ताकद लावली होती. सुरेश देशमुख यांचे चिरंजीव निवडणूक लढवत असलेल्या वॉर्डात त्यांनी दत्तराव रेंगे यांच्यासाठी जोरदार ताकद लावली होती. हाच संदर्भ पकडत सुरेश देशमुख यांनी दीदीची लाल दिव्याची गाडी रात्री दोन वाजताही आमच्या वॉर्डात यायची. लाल दिव्याची गाडी, सोबत पोलिसांच्या बंदोबस्ताचे देशमुख यांनी आपल्या स्टाईलमध्ये वर्णन केले.

Parbhani
International School Name Misuse: राज्य, CBSE बोर्डाच्या शाळांना आता इंटरनॅशनल, ग्लोबल शब्द वापरता येणार नाहीत, सरकारचा मोठा निर्णय

यावेळी एकच हशा पिकला. खा. संजय जाधव यांनी मिळण्यामध्ये भेदाभेद होत असल्याचा उच्चार केल्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी खा. संजय जाधव यांची नाराजी दूर करण्यात येईल असे सांगितले. महानगरपालिका निवडणुकीवरून सुरेश देशमुख यांनी मारलेल्या कोपरखळयानाही पालकमंत्री बोर्डीकर यांनी उत्तर दिले. आपण पालकमंत्री असले तरी, प्रथम भाजपाची कार्यकर्ती असून पक्षाने दिलेली जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागेल. जिल्ह्यात भाजपच्या विचाराचे काम उभे करायचे आहे, असेही पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या.

Parbhani
Parbhani News | खंडित वीज पुरवठ्यावरून महावितरण - खदानचालक आमनेसामने: दोघांकडून तहसीलदारांकडे कारवाईची मागणी

एकंदरीत खा. रामराव वडकुते यांचा नागरी सत्कार समारंभ राजकीय जुगलबंदीने चांगलाच रंगल्याचे दिसून आले. कार्यक्रमाच्या यशस् वीतेसाठी माजी उपमहापौर भगवान वाघमारे, स्वराज सिंह परिहार, कॉ. कीर्ती कुमार बुरांडे, प्रमोद वाकोडकर, विठ्ठलराव रबदडे, विजय वरपूडकर, प्रा. तुकाराम साठे, संतोष मुरकुटे, चंद्रकांत बोकन, नानासाहेब राऊत, अशोक लवटे, अभय कुंडगीर, चंद्रकांत डहाळे, विशाल बुधवंत, विष्णू कुटे, राजेंद्र बडकर व संयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news