Ayodhya Ram Temple : राम मंदिरात भक्तांकडून २००-५०० ऐवजी १०, २०, ५० रूपयांच्या नोटांचे दान, काय आहे कारण?

राम मंदिरातील देणगीचे गणित बदलले! ५०० रुपयांच्या नोटा कमी, १०-२० रुपयांच्या नोटांची भर; देणगी चोरीचा परिणाम?
Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Temple : राम मंदिरात भक्तांकडून २००-५०० ऐवजी १०, २०, ५० रूपयांच्या नोटांचे दान, काय आहे कारण?file photo
Published on
Updated on

Ram temple theft of offerings has had a direct impact on donations with 200 500 rupee-notes in short suppl

पुढारी ऑनलाईन : राम मंदिरातील निधीतील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्याने त्‍याचा थेट परिणाम आता भक्तांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्यांवरही दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी दानाच्या मोजणीवेळी १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांची मोठ्या प्रमाणात बंडले तयार होत असत. मात्र आता १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे दिसत आहे.

Ayodhya Ram Temple
Global Drought Crisis | जगालाच सतावणार दुष्काळाच्या झळा

सूत्रांच्या माहितीनुसार, अलीकडील घडामोडींनंतर भक्तांनी देणगी देण्याच्या पद्धतीत बदल केल्याचा हा परिणाम असू शकतो. तथापि, मंदिर ट्रस्टकडून भक्तांची संख्या कमी झाल्याबाबत किंवा देणगीत घट झाल्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे देणगीतील घट आणि त्यामागील कारणांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

भाविकांची संख्या घटली; व्यापार आणि देणग्यांवर परिणाम

श्रीराम जन्मभूमी मंदिरात सध्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यापर्यंत दररोज सुमारे १ लाख भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येत होते. मात्र सध्या ही संख्या घटून सुमारे ६० हजारांवर आली आहे.

Ayodhya Ram Temple
Monsoon Oil Price Impact | अर्थचक्राला ‌‘इंधन‌’

भाविकांची संख्या कमी झाल्याचा परिणाम मंदिर परिसरातील व्यापारावरही झाला आहे. रामपथ आणि मंदिर परिसरातील प्रसाद, पूजासाहित्य, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायाशी संबंधित अनेक व्यापाऱ्यांनी विक्री घटल्याचे सांगितले आहे. काही व्यापाऱ्यांच्या मते, अलीकडे समोर आलेल्या देणग्यातील गैरव्यवहाराच्या प्रकरणामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्याचा परिणाम भाविकांच्या संख्येवर झाला आहे.

व्यापारी राजकुमार यांनी सांगितले की, "देणग्यातील चोरीच्या घटनेचा निश्चितच परिणाम झाला आहे. अचानक भाविकांची संख्या कमी झाली. पूर्वी दररोज २ ते २.५ हजार रुपयांची कमाई होत होती, ती आता ५०० ते ७०० रुपयांपर्यंत घसरली आहे."

संजय पांडेय यांनीही भाविकांची संख्या घटल्याने व्यापारावर परिणाम झाल्याचे सांगितले. त्यांच्या मते, देणग्यातील चोरीचे प्रकरणही यामागील एक कारण असू शकते.

मात्र व्यापारी महेंद्र सिंह यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी जुलै महिन्यात शाळा-कॉलेज सुरू होणे, पावसाळा आणि सुट्ट्या संपणे या कारणांमुळे भाविकांची संख्या नैसर्गिकरित्या कमी होते. त्यामुळे या घटीचा संबंध केवळ देणगी चोरी प्रकरणाशी जोडणे योग्य ठरणार नाही.

रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी

दरम्यान, रेल्वेमार्गाने अयोध्येत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे. सध्या दररोज सुमारे ८४ गाड्या ये-जा करत आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात दररोज ४० ते ५० हजार भाविक रेल्वेने येत असत. मात्र सध्या ही संख्या २० ते २५ हजारांपर्यंत खाली आली आहे.

दुसरीकडे, हवाईमार्गाने येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत विशेष घट झालेली नाही. सध्या १० विमानसेवा सुरू असून दररोज सुमारे १,५०० ते १,६०० प्रवासी अयोध्येत पोहोचत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news