Rajinikanth | अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट

चेन्नईतील रूग्णालयात उपचार सुरू; सध्या प्रकृती स्थिर
Rajinikanth
अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आहे. पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रजनीकांत यांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून रजनीकांत लोकेश कनगराज दिग्दर्शित त्यांच्या आगामी 'कुली' या चित्रपटाचे शूटिंग करत होते. चित्रपटाचे शूटिंग सध्या विशाखापट्टणम येथे सुरू आहे. वेट्टायनच्या ऑडिओ लाँचला उपस्थित राहण्यासाठी ते २० सप्टेंबर रोजी चेन्नईला गेले होते. ऑडिओ लॉन्चच्यावेळी रजनीकांत यांनी संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि गीतकार सुपर सुब्बू यांच्यासोबत मनशिलायोचे हुकस्टेप सादर केले होते. या कार्यक्रमात त्यांनी जवळपास एक तास भाषणही केले होते. Vettaiyan हा रजनीकांत यांचा आगामी चित्रपट आहे, जो १० ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news