Crime News: ५० वर्षाच्या महिलेनं आधी चहाला बोलवलं... नंतर हात पाय तोडले, गळा चिरला; पाच दिवसांनी पोलिसांनी खुनाचा लावला छडा

Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Rajasthan Tonk Crime: एसपी रोशन मीना यांनी डीएसपी मृत्यूंजय मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या पथकाचे काम हे एका ब्लाईंड मर्डर केसचा छडा लावण्याचं होतं. पोलिसांनी एक एक कडी जोडून हे आव्हानात्मक खुनाचं प्रकरण उजेडात आणलं. पोलिसांनी या प्रकरणी ५० वर्शाच्या रसाल देवी यांना अटक केली आहे.

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील लवादर गावात एक धड, हात पाय नसलेला मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह ७० वर्षाच्या विधवा हरबाई यांचे होते. एसपी रोशन मीना यांनी सांगितलं की आरोपी रसाल देवी यांनी सावकारांकडून कर्ज घेतलं होतं. ती कर्जात पार बुडाली होती. सावकार तिच्याकडे पैशासाठी तगादा लावत होते. तिच्यावर दबाव निर्माण करत होते.

Crime News
Crime News: १४ महिन्यापूर्वी लग्न.. १ कोटीपेक्षा जास्त खर्च.. छतावरून उडी मारून संसारासकट आयुष्य संपवलं

नजर चांदीच्या दागिन्यावर पडली अन्...

त्यातच रसाल देवीची नजर हरबाई गुर्जर यांच्या हातात आणि पायात असलेल्या चांदीच्या कड्यांवर पडली. त्यानंतर रसाल देवीने ९ जून रोजी हरबाई यांना आपल्या घरी चहासाठी बोलवलं. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून संधी मिळताच रसाल देवीने कुऱ्हाडीने हरबाईच्या मानेवर वार केला. तिची हत्या केली. यानंतर रसाल देवीनं हरबाईचे डोके, दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून टाकले आणि त्यातून चांदीचे कडे काढून घेतले.

एसपींनी सांगितलं की यानंतर रसाल देवीने शरीर आणि धड, हात पाय पोत्यात भरले आणि रात्रीच्या अंधारात गावाच्या बाहेर कचरा पेटीत टाकून दिला. शीर काही अंतरावरच असलेल्या दुसऱ्या ठिकाणी टाकून दिलं होतं.

Crime News
Crime News: वेब सीरिज पाहून प्लॅन, पाच महिने तयारी आणि जळालेली कार; अल्पवयीन मुलाने कुटुंबातील चौघांची हत्या कशी केली?

तीन दिवस घरातच होती रसाल देवी

एसपींनी सांगितलं की मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर रसाल देवीने तीन दिवस आपलं घर सोडलं नव्हतं. या काळात रसाल देवीकडून सर्व पुरावे नष्ट करण्याचे पूर्ण प्रयत्न झाले. एसपींनी सांगितलं की रसालला तीन मुलं आहेत ही गावाच्या बाहेर अनिय जिल्ह्यात राहतात. या मुलांच्या लग्नासाठीच रसालदेवीनं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज व्याजासह जवळपास २५ लाख रूपये इतकं झालं होतं. रसालला ८ लाख रूपये त्वरित फेडायचे होते. त्यामुळं तिने हा खून केला.

Crime News
Crime news | तब्बल १,४०० किलोमीटरचा प्रवास...पाठीवर बॅग अन् सोबत लहान मूल! प्राध्यापिकेच्या हत्येचे गूढ पोलिसांनी कसं उकललं?

कुऱ्हाड आणि दागिने पोलिसांनी केले जप्त

एसपींनी सांगितंल की पोलीसांनी मिळालेल्या पुराव्याची एक एक कडी जोडली अन् रसाल देवीपर्यंत पोहचले. त्याचबरोबर पोलिसांनी हत्येत वापरण्यात आलेली कुऱ्हाड, हरबाईचे दागिने जप्त केले आहेत. मेहंदवास पोलीस ठाण्यात रसाल देवीची सविस्तर चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news