Crime News: १४ महिन्यापूर्वी लग्न.. १ कोटीपेक्षा जास्त खर्च.. छतावरून उडी मारून संसारासकट आयुष्य संपवलं

Crime News
Crime Newspudhari
Published on
Updated on

Crime News: जलपूरा गावातील एका विवाहितेच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. जवळपास १४ महिन्यापूर्वी या विवाहितेचे लग्न झाले होते. या लग्नात १ कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता. अशी धमुधडाक्यात केलेल्या लग्नाचा शेवट अत्यंत वाईट आणि वेदनादायी झाला आहे. या नवविवाहितेने सासरच्या हुंड्याची मागणी आणि सततच्या छळाला कंटाळून हे टोकाच पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर कुटुंबीय हादरून गेले आहेत. पोलिसांनी पती, सासऱ्याला अटक केली आहे.

Crime News
Shocking crime news : लग्न झाले, ४ दिवस उलटले अन्...; फक्त एका सोन्याच्या चेनसाठी नववधूला जिवंत जाळले

ही घटना ग्रेटर नोएडीमधील जलपुरा गावातील आहे. मृत महिलेचं नाव दिपीका असून ती मुळची कुडी खेडा गावची आहे. तिचे लग्न जवळपास दीड वर्षापूर्वी जलपुरामधील ऋतिकसोबत झालं होतं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी लग्नात जवळपास एक कोटी रूपये खर्च केले होते. त्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला होता. मात्र तरी देखील सासरच्या मंडळींची मागणी काही संपत नव्हती.

Crime News
viral news | "मी ४१ वर्षांची झालेय, तरीही घरचे लग्न लावून देत नाहीत!" : महिलेची कुटुंबाविरुद्ध थेट पोलिसांत धाव!

लग्नानंतर काही महिन्यातच सगळं बदललं

नातेवाईकांनी सांगितलं की सुरूवातीच्या काही महिन्यात सर्व सामान्य होतं. मात्र हळूहळू दीपिका यांच्यावर दबाव वाढू लागला. कुटुंबीयांनी सांगितलं की हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला होता. अनेकवेळा तिला मारहाण झाली होती. दीपिकाच्या माहेरच्या लोकांनी सांगितंल की त्यांची मुलगी सतत टेन्शनमध्ये रहात होती. मात्र समाज आणि नाते टिकवण्यासाठी ती सर्व सहन करत होती. कुटुंबीयांनी सांगितलं की अनेकवेळा समेट घडवून आणला होता. मात्र परिस्थिती काही सुधारली नाही. शेवटी एका रात्री बातमी आली आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. दीपिकाने घराच्या छतावरून उडी मारून जीव दिला अशी माहिती मिळाली.

Crime News
Crime News: पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रियकरानेच केली प्रेयसीची निर्घृण हत्या

रात्रीत खळबळ

घटनेची माहिती मिळताच इकोटेक - ३ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. रात्री उशिपार्यंत घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती त्यामुळं वातावरण तणावपूर्ण झालं होतं.

मृत दीपिकाचे वडील संजय यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आरोप करण्यात आला की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. लग्नात सर्वकाही देऊनही सासरच्या मंडळींच्या मागण्या सुरूच होत्या.

Crime News
Crime News: त्याच्याशीच लग्न करणार म्हणाली; संतापलेल्या बापाने लेकीची हत्या केली, मृतदेह आधी विहिरीत फेकला, मग बाहेर काढून...

पोलिसांनी त्वरित कारवाई केली

सेंट्रल नोएडाचे डीसीपी शैलेंद्र कुमार सिंह यांनी सांगितलं की शनिवारी रात्री जलपुरामध्ये एक महिलेचा छतावरून पडून मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले. त्यांनी आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू केली. मृत महिलेच्या नातेवाईकांच्या आरोपानंतर संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणी पती ऋतिक आणि सासरे मनोज यांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी वेगवगेळ्या अँगलने तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news