Rahul Gandhi: मतदान ओळखपत्र पाहून मिळणार योजनांचा लाभ... आधार कार्डला नाही 'आधार'; राहुल गांधींनी 'तो' Video केला शेअर

Rahul Gandhi Voter id For Scheme: हे सरकार लोकांचा हक्क देखील हिसकावून घेत आहे असा आरोप राहुल गांधींनी केला.
Rahul Gandhi
Rahul Gandhipudhari
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi Voter id For Scheme: काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ भाजपचे केंद्रीय मंत्री लल्लन सिंह यांचा आहे. या आधारे त्यांनी आता सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड नाही तर मतदान कार्ड पाहून योजनांचा लाभ मिळणार आहे असा दावा केला.

राहुल गांधी यांनी हा दावा थेट मतदार यादीतून नावे कमी करणे आणि मत चोरीशी जोडला आहे. त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत आता हे सरकार लोकांचा हक्क देखील हिसकावून घेत आहे असा आरोप केला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi On Gokul : ४ संचालक घुसवा, १२ चे १६ करा... भाजपची जनादेशात 'भेसळ' म्हणत राहुल गांधींची गोकुळच्या राजकारणात उडी

हे खूप मोठं षडयंत्र

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, आता मोदी सरकारमधील मंत्र्यांनी कल्याणकारी योजनांचा फायदा आधार कार्डच्या आधारे मिळणार नाही तर मतदान ओळख पत्राच्या आधारे मिळणार आहे जाहीर केले आहे.

राहुल गांधी पोस्टमध्ये लिहितात, 'षडयंत्र तर खूप मोठं आहे. तुम्ही शांतपणे हे समजून घ्या. एसआयआरच्या नावावर करोडो लोकांची नावे मतदार यादीतून कापली जात आहेत. जर हे थांबवलं गेलं नाही तर तुमचे देखील नाव कमी केलं जाऊ शकतं. प्रामुख्याने कमी केलेली नावे कोणती आहेत? भाजपविरूद्ध आक्रोश करणाऱ्यांची आहेत.

Rahul Gandhi
SIR Form 6 : यादीत नाव असतानाही ‘फॉर्म ६’ भरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही : निवडणूक आयोगाने संभ्रम केला दूर

निवडणूक आयोगावरही निशाणा

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी मतदारांची यादी ही एका निष्पक्ष निवडणूक आयोगाच्या हातात असली पाहिजे. मात्र ही यादी सरकारचे कर्मचारी ज्ञानेश कुमार यांच्या हातात आहे.

Rahul Gandhi
Maharashtra Skill Development Scheme : पहिल्या टप्प्यातील शंभर महात्मा जोतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्रांना मान्यता

नाव कापलं तर मत अन् हक्क देखील जाणार

राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर सरकारी योजानांशी जोडले अन् चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी जर वोटर लिस्टमध्ये नाव नसले तर लोकांना योजनांचा लाब मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. आज पंचायत राजच्या योजनांसाठी मतदान ओळख पत्र सक्तीचं केलं जात आहे. उद्या रेशन, पेन्शन, मनरेगा, घरकुल, शिष्यवृत्ती आणि आरक्षण यासाठी देखील ही अट लागू होईल.

राहुल गांधी म्हणाले, जर कोणी भाजपला हटवण्याचा निर्णय घेतला तर त्यांची नावे मतदार यादीतून कट केली जाऊ शकतात. राहुल गांधी यांनी ही फक्त मत चोरी नाही तर अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.