Maharashtra Skill Development Scheme : पहिल्या टप्प्यातील शंभर महात्मा जोतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्रांना मान्यता

कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते १२ केंद्रांचे उद्‌घाटन
Maharashtra Skill Development Scheme
मंगलप्रभात लोढाpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : आता अवघ्या ३०० चौरस फुटांच्या जागेतही कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार आहे. यापूर्वी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. आता किमान ३०० ते १,५०० चौरस फुटांच्या जागेत केंद्र सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय, ‘महात्मा जोतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ या योजनेत पहिल्या टप्प्यात १०० केंद्रांना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी १२ केंद्रांचे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.

मेट्रो चौक येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलच्या आवारातील दक्ष हॉल येथे योजनेचे ऑनलाइन उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमाला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त डॉ. अमित सैनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

Maharashtra Skill Development Scheme
CM Pramod Sawant | भाजपची विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा

नागपूर, डहाणू-पालघर, नंदुरबार, यवतमाळ, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग आणि जळगाव या जिल्ह्यांतील १२ केंद्रांचा त्यात समावेश आहे. झोपडपट्ट्या, दुर्गम व डोंगराळ भाग, नक्षलग्रस्त क्षेत्रे आणि आदिवासी वस्त्यांतील युवक-युवतींना प्रशिक्षणाची संधी देण्यावर भर असेल. २०२६ हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.

या निमित्ताने कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू होणाऱ्या केंद्रांना ‘महात्मा जोतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या गावी या उपक्रमाची घोषणा केली होती. युवकांना आधुनिक बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे, हा योजनेचा उद्देश आहे, असे लोढा यांनी सांगितले.

Maharashtra Skill Development Scheme
MPSC Group C Recruitment : एमपीएससी ‘गट-क’ पदसंख्या ११ हजारांनी वाढवा, वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत द्या

स्थानिक युवकांना रोजगाराची संधी

स्थानिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्या समन्वयातून प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक युवकांना त्यांच्या परिसरातच प्रशिक्षण घेता येईल, तसेच उद्योगांना आवश्यक कौशल्याधारित मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.