Rahul Gandhi On E20 Petrol Scam: E20 च्या नावाखाली तुम्हाला सपशेल गंडवलं... राहुल गांधींनी थेट लॅबमधील रिपोर्ट दाखवला

E20 पेट्रोलच्या १४ पैकी ११ नमुन्यामध्ये इथेनॉलचे प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आले आहे.
Rahul Gandhi On E20 Petrol Scam
Rahul Gandhi On E20 Petrol Scampudhari
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi On E20 Petrol Scam: लोकसभा विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पेट्रोल कंपन्या ग्राहकांसोबत ४२० गिरी करत आहेत असा आरोप केला. त्यांनी E20 पेट्रोलमध्ये इथिनॉलचा कंटेट हा २० टक्के असायला हवा मात्र प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्याचे प्रमाणे जवळपास ३० ते ३१ टक्क्यांपर्यंत जात आहे. ही चाचणी कर्नाटकात करण्यात आली आहे. याबाबत राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट केली आहे.

Rahul Gandhi On E20 Petrol Scam
Rahul Gandhi: मतदान ओळखपत्र पाहून मिळणार योजनांचा लाभ... आधार कार्डला नाही 'आधार'; राहुल गांधींनी 'तो' Video केला शेअर

१४ पैकी ११ नमुन्यात इथेनॉलचे जास्त प्रमाण

राहुल गांधी आपल्या एक्स पोस्टमध्ये दावा करतात की मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या E20 पेट्रोलच्या १४ पैकी ११ नमुन्यामध्ये इथेनॉलचे प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आले आहे. हे नमुने इंडियन आईल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या पेट्रोलचे होते. त्यात अनुक्रमे ३१.२ आणि ३०.५ टक्के इथेनॉल आढळून आले आहे.

Rahul Gandhi On E20 Petrol Scam
Rahul Gandhi On Gokul : ४ संचालक घुसवा, १२ चे १६ करा... भाजपची जनादेशात 'भेसळ' म्हणत राहुल गांधींची गोकुळच्या राजकारणात उडी

नुकसान कोणाचं तुमचंच!

राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 'E20 आता ४२० मध्ये रूपांतरित झालं आहे. लोकांच्या गाडीतून आता पेट्रोल चोरी देखील होत आहे. सरकार आणि खासगी कंपन्या सर्वांच्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण हे ठरलेल्या मानकापेक्षा जास्त आहे. कंपन्यांच्या आपल्या लॅबने इथेनॉलची मात्रा आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलेलीच नाही. याचा अर्थ तुम्ही महागड्या पेट्रोलचे पैसे देताय मात्र तुमच्या गाडीच्या टाकीत इथेनॉल भरलं जात आहे. यात नुकासन कोणाचं होणार आहे तुमचंच!'

Rahul Gandhi On E20 Petrol Scam
Nitin Gadkari On Ethenol Allegation : माझी राजकीय प्रतिमा स्वच्छच... मुलाच्या इथेनॉल कारखान्यावरून राळ उठवणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार

पेट्रोल पंपावर स्पष्ट लेबलिंग का नाही?

राहुल गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये, याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार हे सांगितलं. त्यांनी पेट्रोलमध्ये जेवढे जास्त इथेनॉल तेवढे गाडीचे मायलेज कमी येणार, तसेच मेंटेनन्स कॉस्ट देखील जास्त येणार, गाड्या या सारख्या पेट्रोलसाठी तयार झालेल्या नाहीत त्यामुळं त्यांचे देखील नुकासन होणार आहे.

तसेच राहुल गांधी यांनी पेट्रोल पंपावर स्पष्ट लेबलिंग नसण्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी यांनी ग्राहकांना ते खरेदी करत असलेल्या पेट्रोलमध्ये किती इथेनॉल आहे याची माहिती दिली जात नाहीये.

Rahul Gandhi On E20 Petrol Scam
कोणत्या देशांत E20 पेट्रोल वापरलं जातं? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं

राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधानांना याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. देशात वितरित होणाऱ्या पेट्रोलमध्ये खरोखर किती इथेनॉल मिसळलं जात आहे आणि जर नियम मोडला जात असेल तर त्या कंपन्यांवर कोणती कारवाई करण्यात येणार आहे याचा स्पष्टीकरण द्या असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी सरकारला याबाबत थेट चर्चेचं आव्हान दिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.