कोणत्या देशांत E20 पेट्रोल वापरलं जातं? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

पुढारी वृत्तसेवा

भारतात E20 पेट्रोलवरुन वाद

देशभरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर आता E20 पेट्रोल उपलब्ध आहे. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून हे इंधन तयार केले जाते.

ब्राझील आहे जगात आघाडीवर

ब्राझीलमध्ये E27.5 ते E30 पेट्रोल सर्वसामान्यांसाठी वापरले जाते. इतकेच नाही तर E100 म्हणजे 100% इथेनॉलवर चालणारी वाहनेही मोठ्या प्रमाणात आहेत.

झिम्बाब्वेमध्ये E20 अनिवार्य

झिम्बाब्वेने राष्ट्रीय इंधन धोरणाचा भाग म्हणून E20 पेट्रोलचा वापर बंधनकारक केला आहे.

पॅराग्वे आणि बोलिव्हियाही पुढे

पॅराग्वेमध्ये E30 तर बोलिव्हियामध्ये E25 पर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर केला जातो.

थायलंडमध्ये E20 लोकप्रिय

थायलंडमध्ये E20 हे सर्वाधिक लोकप्रिय इंधनांपैकी एक आहे. काही वाहनांसाठी E85 देखील उपलब्ध आहे.

अमेरिका आणि कॅनडाचे वेगळे मॉडेल

या देशांमध्ये E10 आणि E15 सर्वाधिक वापरले जाते. मात्र फ्लेक्स-फ्युएल वाहनांसाठी E85 इंधनही उपलब्ध आहे.

युरोपमध्ये काय स्थिती?

फ्रान्स, जर्मनीसह अनेक युरोपीय देशांमध्ये E10 प्रचलित आहे. भविष्यात E20 लागू करण्याबाबत युरोपियन युनियन विचार करत आहे.

फिलीपिन्समध्येही E20 ला परवानगी

फिलीपिन्समध्ये E10 अनिवार्य असले तरी तेल कंपन्यांना स्वेच्छेने E20 विकण्याची मुभा देण्यात आली आहे.

प्रत्येक आंदोलनात 'हा' फोटो का असतो? कोण आहे हा क्रांतिकारक?

येथे क्लिक करा