Raghav Chadha | 'घायल हूं, इसलिए घातक हूं' धुरंधरमधला डायलॉग मारत राघव चढ्ढा यांचा आपला इशारा!

संसदेत शिवीगाळ करणे-माइक तोडण्यासाठी गेलो नाही, दूसरा व्हिडीओ टाकत पक्षाने केलेले आरोप फेटाळले,
Raghav Chaddha
Raghav Chaddha
Published on
Updated on

नवी दिल्ली : आम आदमी पक्षा (आप) च्या राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवल्यानंतर खासदार राघव चढ्ढा यांनी शनिवारी दुसरा व्हिडिओ जारी केला. यामध्ये त्यांनी 'आप'ने केलेल्या आरोपांना फेटाळले. पक्षाने केलेल्या आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नसल्याचे ते म्हणाले. मला बोलायचे नव्हते, पण मी गप्प राहिलो असतो तर वारंवार बोललेले खोटे खरे वाटू लागेल, असे चढ्ढा म्हणाले. राघव चढ्ढा यांनी 'धुरंधर' चित्रपटातील 'घायल हूं, इसलिए घातक हूं' हा संवाद म्हणत 'आप'ला इशारा दिला.

खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, कालपासून माझ्याविरोधात एक स्क्रिप्टेड मोहीम चालवली जात आहे. तीच भाषा, तेच बोलणे, तेच आरोप. हा काही योगायोग नाही, तर एक समन्वित हल्ला आहे. आधी मला वाटले की मी याला उत्तर देऊ नये. मग वाटले की एक खोटे शंभर वेळा बोलले तर ते खरे मानले जाते. म्हणून, मी विचार केला की उत्तर द्यावे.

Raghav Chaddha
Raghav Chadha Video: 'मेरी खामोशी को मेरी हार मत समझना...', राघव चड्ढांचा AAPवर निशाणा, राजकारणात खळबळ

 ते म्हणाले की, माझ्यावर ३ आरोप केले, ज्यामुळे मला संसदेत बोलण्याची संधी दिली जाणार नाही. मी संसदेत गोंधळ घालण्यासाठी, ओरडण्यासाठी, माइक तोडण्यासाठी किंवा शिवीगाळ करण्यासाठी गेलो नाही, तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी गेलो आहे, असे ते म्हणाले. शेवटी राघव चढ्ढा यांनी 'धुरंधर' चित्रपटातील 'घायल हूं, इसलिए घातक हूं' (मी जखमी आहे, म्हणून घातक आहे) हा संवाद म्हणत 'आप'ला इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news