DA Arrears Controversy: लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थकवणाऱ्या मुख्य सचिवावर कोर्टाने दिला दणका

DA hike 2026
DA hike 2026file photo
Published on: 
Updated on: 

DA Arrears Controversy: पंजाबमधील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांचा थकित महागाई भत्ता आणि महागाई राहत भत्ता यांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आपल्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना अवमान नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर एक लाख रूपयांचा दंड ठोठावत १० दिवसात उत्तर देण्यास सांगितलं आहे.

DA hike 2026
PCMC Property Tax Arrears: थकबाकीदार मालमत्तांवर ३० सप्टेंबरनंतर जप्ती; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेली ३ ऑगस्टच्या आदेशाचे आतापर्यंत का पालन झालं नाही असं विचारण्यात आलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी आरोप केला की सरकारने थकबाकी दिलेली नाहीच तसेच न्यायालयात त्यांनी आदेशाची पुर्तता केल्याचा रिपोर्ट देखील दाखल केलेला नाही.

DA hike 2026
8th Pay Commission : लेव्हल ९ ते ११ च्या कर्मचाऱ्यांना पुढील १० वर्षांत लाखो रुपयांचा थेट लाभ, जाणून घ्या सविस्तर..

न्यायालयाची कडक टिप्पणी

या कार्यवाहीवेळी कोर्टाने कडक टिप्पणी करत अनेक प्रश्न विचारले. सरकारने कर्मचाऱ्यांना डीए आणि डीआर लाभ का थांबवून ठेवला आहे. दुसरीकडे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लाभ का थांबवला नाही.

वरिष्ठ वकील सनी सिंगला यांच्या मते, कर्मचाऱ्यांनी ३ ऑगस्टला दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच मागणी केली. त्यामुळं हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात पोहचलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात SLP दाखल करण्याची तयारी

या याचिकेच्या सुनावणीवेली पंजाब सरकारने उच्च न्यायालयात सांगितलं की आम्ही सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल करण्याच्या तयारी पूर्ण केली आहे. दिवाळीनंतर या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावेळी याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत मोफत योजनांवरील सरकारी खर्च थांबवण्याची मागणी केली.

DA hike 2026
8th Pay Commission Update: फिटमेंट फॅक्टर ४.०, सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, जर असं झालं तर पगार किती वाढणार?

काय आहे प्रकरण?

हा वाद पंजाब सरकार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता आणि महागाई दिलासा भत्ता यांच्याबाबतचे आहे. पंजाब स्टेट पावर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निवृत्ता चीफ इंजिनियर निर्मल सिंह ढिल्लो यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने अवमान याचिका दाखल केली होती.

ऑक्टोबरमध्ये जस्टीस हर्ष बुंगर यांच्या पीठासमोर कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी आरोप केला होता की सरकार डीए आणि डीआरचे पेमेंट करण्यापासून टाळाटाळ करत आहे. त्यामुळे ते सतत हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

आता १७ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लक्ष

उच्च न्यायालयाने नवा पवित्रा घेतला असून आता पंजाबच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांची नजर १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे आहे. यापूर्वी मुख्य सचिवांना न्यायालयात उत्तर द्यावं लागणार आहे. सध्या तरी डीएची थकबाकी देण्याबाबत कोणती नवीन तारीख निश्चित झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.