Pahalgam Terror Attack | दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात केक नेमका कशासाठी?

पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर संतप्त नागरिकांची निदर्शने
Pahalgam Terror Attack
पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. pudhari photo
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांनी दिल्लीस्थित पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर निदर्शने केली. यावेळी पाकिस्तानविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, उच्चायुक्तालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता आणि पाकिस्तान उच्चायुक्तालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान बाहेर निदर्शने सुरू असताना इतक्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये त्यांनी केक नक्की कुठल्या कारणासाठी आणला, याची चर्चा घटनास्थळावर होती.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध देशभर संतापाची लाट आहे. सरकारसह विरोधी पक्षांनीही तसे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या वतीने पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उच्चायुक्तालयातील वरिष्ठ सल्लागारांनाही आठवडाभराच्या आत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ही निदर्शने झाली.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack | पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍याच्या निषेर्धाथ डोंबिवलीत कडकडकीत बंद

पाकिस्तान उच्चायुक्तालयात केक कशासाठी?

दरम्यान, ही निदर्शने सुरू असताना एक डिलिव्हरी बॉय केक घेऊन आला. तो केक घेण्यासाठी उच्चायुक्तालयातून एक व्यक्ती बाहेर आला. त्याने तो केक घेतला आणि आतमध्ये घेऊन गेला. मात्र बाहेर निदर्शने सुरू असताना इतक्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये त्यांनी केक नक्की कुठल्या कारणासाठी आणला, याची चर्चा घटनास्थळावर होती. या केकच्या माध्यमातून एक तर भारतावर असलेल्या दुखद प्रसंगात असुरी आनंद साजरा करण्यासाठी किंवा हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही, हे दर्शवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला केल्याचे समजते.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : ‘लाज वाटली पाहिजे...’, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी हिंदू क्रिकेटर भडकला, पंतप्रधान शरीफ यांच्यावर बोचरी टीका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news