

कल्याण : काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप तीन डोंबिवलीकरांचा बळी गेला आहे, या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्तपणे डोंबिवली बंद पुकारला होता.
दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली होती. डोंबिवलीकरांची या बंदला प्रतिसाद देत उस्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवली होती. मात्र सर्वसामान्यांचे व कामावर जाणाऱ्या नोकरदारवर्गाचे हाल होऊ नये म्हणून सकाळच्या सुमारास रिक्षा बसेस चालू ठेवण्यात आल्या होत्या.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व अस्थापना या बंदमध्ये सहभागी होत आहेत, त्यामुळे शाळा बंद असेल, परिणाम स्वरूप गुरुवार दिनांक २४ तारखेला होणारी परीक्षा शनिवार दिनांक २६ तारखेला वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेनुसार होतील, याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी. डोंबिवली बंद मध्ये सहभागी होऊन दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करूया असा संदेश. संपूर्ण डोंबिवली मध्ये वायरल देखील करण्यात आला आहे.