Who is Priya Nair: कोल्हापुरात जन्म, मुंबई- पुण्यात शिक्षण; हिंदुस्थान युनिलिव्हरच्या पहिल्या महिला CEO कोण आहेत?

HINDUSTAN UNILEVER LIMITED New CEO: हिंदुस्थान युनिलिव्हरला (HUL) 92 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला CEO मिळाली आहे.
Priya Nair Hindustan Unilever new CEO
Priya Nair Hindustan Unilever new CEOpudhari photo
Published on
Updated on

Hindustan Unilever CEO Who is Priya Nair

नवी दिल्ली : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने प्रिया नायर यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची या पदावर निवड झाली आहे. रोहित जावा यांची त्या जागा घेतील. त्या १ ऑगस्ट २०२५ पासून पदभार स्वीकारतील.

या नियुक्तीमुळे प्रिया नायर HUL च्या CEO आणि MD म्हणून नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आवश्यक मंजुरीनंतर त्या HUL च्या संचालक मंडळातही सामील होतील आणि युनिलिव्हर लीडरशिप एक्झिक्युटिव्ह (ULE) च्या सदस्य म्हणून कार्यरत राहतील. सध्या त्या युनिलिव्हरमध्ये अध्यक्ष, ब्यूटी अँड वेलबीइंग या पदावर कार्यरत आहेत, जो कंपनीच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या जागतिक व्यवसायांपैकी एक आहे.

Priya Nair Hindustan Unilever new CEO
Indian astronaut space farming | शुभांशु शुक्ला यांनी अंतराळ स्थानकात पिकवली मेथी आणि मूग; ही रोपे भारतात आणणार...

प्रिया नायर यांचा कोल्हापूरात जन्म

प्रिया नायर यांचा जन्म कोल्हापूर येथे मल्याळी कुटुंबात झाला आणि त्या मुंबईत वाढल्या. सायडेनहॅम कॉलेज, मुंबई येथून त्यांनी B.Com (Accounts & Statistics) पूर्ण केलं आणि सिंबायोसिस, पुणे येथून MBA (Marketing) केलं. त्यानंतर त्यांनी हावर्ड बिझनेस स्कूल मधून मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केला.

युनिलिव्हरमध्ये ३० वर्षांची कारकीर्द

  • १९९५ मध्ये त्यांनी Consumer Insights Manager म्हणून HUL मध्ये सुरुवात केली.

  • १९९८ मध्ये Dove, Rin, Comfort यांसारख्या ब्रँडसाठी Brand Manager झाल्या.

  • २००४ मध्ये Marketing Manager, 2007 मध्ये General Manager, तर २००९ पासून त्यांनी पश्चिम भारतातील HUL व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली.

  • त्यानंतर त्यांनी Home Care आणि Beauty & Personal Care विभागांसाठी Executive Director आणि CCVP (Customer Development, Consumer and Market Insight, VP) ही जबाबदारी घेतली.

  • भारतातील त्यांच्या मजबूत कामगिरीमुळे त्यांना जागतिक स्तरावर बढती मिळाली. २०२२ मध्ये, त्यांची युनिलिव्हरच्या ब्यूटी अँड वेलबीइंग युनिटसाठी ग्लोबल चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आणि २०२३ मध्ये त्या याच विभागाच्या अध्यक्ष बनल्या.

हिंदुस्तान युनिलिव्हरचे अध्यक्ष नितीन परांजपे यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. "प्रिया यांची HUL आणि युनिलिव्हरमध्ये एक उत्कृष्ट कारकीर्द आहे. मला खात्री आहे की भारतीय बाजारपेठेची सखोल जाण आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रिया HUL ला कामगिरीच्या पुढील स्तरावर घेऊन जातील," असे त्यांनी कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

नायर या रोहित जावा यांची जागा घेतील, जे २०२३ पासून HUL चे CEO आणि MD म्हणून कार्यरत होते. जावा यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने व्हॉल्यूम-आधारित वाढ नोंदवली आणि शहरी भागातील कमी मागणी व ऐच्छिक श्रेणींमध्ये मंद गतीने होणारी सुधारणा अशा आव्हानात्मक बाजारपेठेतून मार्गक्रमण केले. जावा हे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील इतर संधींसाठी पदभार सोडत आहेत, असे HUL ने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.

प्रिया नायर यांचा पगार किती?

एचयूएलचे विद्यमान सीईओ रोहित दावा यांना 2025 या आर्थिक वर्षात 23 कोटी 23 लाख रुपये इतके एकूण वेतन देण्यात आले होते. प्रिया नायर यांचे एकूण वेतन हे 25 कोटींपर्यंत असेल, असे वृत्त न्यूज 18 ने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news