Crime News: लग्नाला ४ महिने, पोटात ३ महिन्यांचं बाळ... संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याने गळफास घेतला, कारण काय?

संरक्षण मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) म्हणून कार्यरत असलेल्या आणि तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
Pregnant Defence Ministry officer death Delhi
Pregnant Defence Ministry officer death Delhi File Photo
Published on
Updated on

Pregnant Defence Ministry officer death Delhi

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयात सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) म्हणून कार्यरत असलेल्या आणि तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेने जीवन संपवल्याची घटना दिल्लीत समोर आली आहे. पती आणि सासरच्यांकडून तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ सुरू होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. नाझिया खान (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. २१ ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली.

४ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, नाझियाचे वडील तवाब खान यांनी पती अजम अली खान, सासू सामिन निशा, सासरे बाबर अली खान तसेच सासरच्या इतर सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, नाझिया खानचा विवाह अजम अली खान याच्यासोबत ११ एप्रिल २०२६ रोजी झाला होता. तेव्हापासून पती आणि सासरचे लोक तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. सासरी होणाऱ्या या वाईट वागणुकीबद्दल ती फोनवरून आपल्या माहेरच्यांना सांगत होती. ती सतत तणावाखाली होती.

Pregnant Defence Ministry officer death Delhi
Crime news: धक्कादायक! पती-पत्नीत वाद झाला, लेकीने माहेरच्यांना फोन केला, मिटवायला घरी आले अन् जावयाचाच खून केला

नाझिया तीन महिन्यांची गर्भवती

नाझिया यांना सासरच्या मंडळींकडून वारंवार शिवीगाळ आणि मारहाण केली जात होती. घराबाहेर काढण्याची तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली जात होती. नाझिया यांनी फोनवरून अनेकदा आपल्या कुटुंबीयांना या त्रासाची माहिती दिली होती. ती तीन महिन्यांची गर्भवती होती. अनेकदा सांगुनही पतीच्या वर्तनात कोणताही बदल झाला नसल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

पतीने पोलिसांना काय सांगितले?

पोलिसांना दिलेल्या जबाबात नाझियाच्या पतीने दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार, नाझियाने त्याला एका खोलीत कोंडून दुसऱ्या खोलीत गेली. त्यानंतर त्याने घरमालकाला फोन केला. घरमालक बाल्कनीत आला आणि शिडीच्या मदतीने त्याला खोलीबाहेर काढले. यानंतर त्याने खिडकीतून पाहिले असता नाझिया छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसली, असे त्याने पोलिसांना सांगितले.

कुटुंबीयांचा हत्या केल्याचा आरोप

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, २१ ऑगस्ट रोजी त्यांना फोन आला आणि त्यांच्या मुलीने जीवन संपवल्याची माहिती मिळाली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिने आत्महत्या केली नसून सासरच्यांनी तिची हत्या केली आहे, असा आरोप माहेरच्यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप तसेच सासरच्यांची भूमिका यांबाबत पोलीस तपास करत आहेत.

Pregnant Defence Ministry officer death Delhi
Crime News: "जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायचं होतं..." पतीनेच रात्रीच्या अंधारात पत्नी अन् १५ वर्षांच्या मुलीचा गळा चिरला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news