Pre Monsoon: २२ मे पर्यंत ‘या’ राज्यांना यलो अलर्ट, अति मुसळधार पावसाचा इशारा

Pre Monsoon: २२ मे पर्यंत ‘या’ राज्यांना यलो अलर्ट, अति मुसळधार पावसाचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क :  यंदा शुक्रवार ३१ मे रोजी एक दिवस आधीच मान्सून भारतातील केरळमध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार २२ मे पर्यंत भारतातील बहुतांश राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान भारताच्या दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश राज्यांना मान्सूनपूर्व पावसाचा (Pre Monsoon) इशारा देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने X पोस्टवरून दिली आहे.

हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, " २२ मे पर्यंत दक्षिण द्वीपकल्पीय भारतामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.  गुरुवार १६ मे ते सोमवार २० मे दरम्यान तामिळनाडू तर सोमवार २० मे पर्यंत केरळमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Pre Monsoon) भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

वायव्य भारतात पुढील ५ दिवस उष्णतेची लाट

तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये शुक्रवार १७ ते रविवार १९ मे, केरळ आणि माहेमध्ये १८ मे आणि १९ मे तर  दक्षिण  कर्नाटकमध्ये  शनिवार १८ मे ते २० मे दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे.  तसेच वायव्य भारत आणि बिहारमध्ये पुढील ५ दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान शनिवार १८ मे रोजी  पूर्व आणि मध्य भारतात उष्णतेची लाट सुरू होईल, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news