प्रवीण तोगडीया म्हणाले, उत्तर प्रदेशात सत्ताधाऱ्यांच्या विजयाचा रस्ता कठीण

प्रवीण तोगडीया म्हणाले, उत्तर प्रदेशात सत्ताधाऱ्यांच्या विजयाचा रस्ता कठीण

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशात मार्च महिन्यात जनता द्यायचा तो निर्णय देईल. परंतु तिथे भाजपाची सत्ता येणे इतके सोपे नाही. कारण शेतकरी नाराज आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय विहिंपचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली. शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी ठार झाले. मरणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही भरपाई तसेच हमीभावाचा कायदा मिळालेला नाही, याकडे तोगडीया यांनी लक्ष वेधले.

प्रवीण तोगडीया पुढे म्हणाले, युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू दु:खद घटना आहे. आम्ही आमच्या मुलाला डॉक्टर होण्यासाठी पाठवले होते. त्याऐवजी त्याचा मृतदेह येत आहे. युद्ध होणार हे १५ फेब्रुवारीला स्पष्ट झाले होते. विदेश मंत्रालयाने अॅडव्हायझरी जारी केली होती. त्याच वेळी युक्रेनमधील सर्व १८ हजार विद्यार्थ्यांना भारतात आणायला हवे होते. भारत सरकारने त्यांना आणण्यास उशिर केला. त्यात एका विद्यार्थ्याचा नाहक जीव गेला.

देशात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ४५ हजार विद्यार्थी शिकत आहेत आणि भारताचे ७० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी विदेशात शिकत आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण खूप महागडे आहे. ७५ लाख ते १ कोटी येथे लागतात. तर बाहेर देशात फक्त २५ लाखांत शिक्षण होते. हे केंद्र सरकारचे अपयश आहे. केंद्र सरकारने युक्रेनमध्ये कोठे, किती विद्यार्थी आहेत याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी.

युक्रेनमधील विद्यार्थी मायदेशी परतणे महत्वाचे आहे. भारताचा तटस्थ राहण्याचा निर्णय योग्य आहे. कारण अमेरिका आणि रशियासोबतही आपले करारमदार आहेत. शेतकरी आंदोलन वेळीच संपवले असते तर मार्ग सोपा झाला असता. मागे याच शेतकऱ्यांनी भाजपाला मतदान केले होते. २० हजार कोटी अफगानिस्तानला दिले. पण, शेतकऱ्यांना देण्यास पैसा नाही, असे कसे असा सवाल तोगडीयांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news