Russia Ukraine War माफिया अमेरिकेमुळे युक्रेन फसला : इराण | पुढारी

Russia Ukraine War माफिया अमेरिकेमुळे युक्रेन फसला : इराण

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा इराणकडून अमेरिकेला लक्ष्य करण्यात आले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Iran Supreme Leader Ayatollah Ali Khamenei) म्हणाले की, युक्रेन अमेरिकेने (America) निर्माण केलेल्या संकटाचा बळी आहे. खामेनी म्हणाले की इराणला युक्रेनमधील युद्ध संपवायचे आहे, परंतु संघर्षाच्या मुळांकडेही पाहिले पाहिजे. अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही हे युक्रेनमधील संकटाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

मंगळवारी (दि. १) दूरचित्रवाणीवरील भाषणादरम्यान अयातुल्ला अली खामेनी म्हणाले की, या संकटाचे मूळ कारण ओळखले पाहिजे आणि पाश्चात्य शक्तींना देखील पहावे लागेल. खामेनी यांनी अमेरिकेसाठी ‘माफिया’ हा शब्दही वापरला. खामेनी म्हणाले की, अमेरिकेची “माफिया राजवट” जगभरात संकटे निर्माण करत आहे. त्यात आयएसआयएसचाही उल्लेख करण्यात आला असून इतर देशही त्यात कसे सामील होतात, असे सांगितले.

सुप्रीम लीडर खामेनी म्हणाले की युक्रेन देखील अशा धोरणांचा बळी ठरला आहे आणि या परिस्थितीत उभे रहावे लागत आहे. युक्रेन युद्धावरील (Russia Ukraine War)आपल्या तासभराच्या भाषणात खामेनी यांनी पुन्हा एकदा रशियाचा उल्लेख केला नाही. खामेनी म्हणाले की, जगभरातील सरकारे आणि लोकांनी युक्रेनच्या संकटातून शिकले पाहिजे की पश्चिमात्यांवर विश्वास ठेवता येणार नाही.

अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य सैन्याने माघार घेतल्याचा संदर्भ देत खामेनी म्हणाले की प्रशासन आणि राजकारण्यांना पाश्चात्य सरकारांचा पाठिंबा आहे. खामेनी म्हणाले की जनता हे सरकारचे सर्वात महत्वाचे समर्थक आहेत आणि जर युक्रेनच्या जनतेने त्यांच्या सरकारला पूर्ण पाठिंबा दिला असता तर आज ते जिथे आहेत तिथे नसते.

Back to top button