Poonch LoC Landmine Blast: पुंछमध्ये मोठा स्फोट! भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी; सीमेवर खळबळ, नेमकं काय घडलं?

Poonch LoC Landmine Blast: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ बारूदी सुरंग निकामी करताना झालेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाले.
Poonch LoC Landmine Blast
Poonch LoC Landmine BlastPudhari
Published on
Updated on

Poonch LoC Landmine Blast: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) बारूदी सुरंग निकामी करताना झालेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाले. बुधवारी सायंकाळी मेंढर सेक्टरमधील कंगा गली परिसरात ही घटना घडली. जखमी जवानांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे बॉम्ब निकामी करणारे पथक (Bomb Disposal Squad) तपासणी करत असताना त्यांना कंगा गली परिसरात एक बारूदी सुरंग आढळली. ही सुरंग सुरक्षितपणे निकामी करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक स्फोट झाला आणि त्यात दोन जवान जखमी झाले.

Poonch LoC Landmine Blast
Delimitation Bill: परिसीमन आणि महिला आरक्षणासाठी सरकारची मोठी खेळी; 17 ऑगस्टपासून विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता

घुसखोरी रोखण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ बारूदी सुरंग

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी बारूदी सुरंग पेरण्यात आलेल्या असतात. मात्र, मुसळधार पावसामुळे काही वेळा या सुरंग आपल्या मूळ जागेवरून वाहून जातात किंवा सरकतात. त्यामुळे अशा सुरंगांचा शोध घेऊन त्यांना वेळोवेळी निकामी करण्याची मोहीम राबवली जाते. अशाच एका कारवाईदरम्यान हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.

गंजलेले स्फोटकही केले निकामी

दरम्यान, पुंछमधील नालवा-देगवार तरवान परिसरात काम करणाऱ्या मजुरांना एक गंजलेले संशयास्पद स्फोटक आढळून आले. याची माहिती मिळताच लष्कराचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करत ते स्फोटक सुरक्षितपणे निकामी केले.

Poonch LoC Landmine Blast
Jharkhand Lightning Tragedy | झारखंडमध्ये वीज कोसळून १४ ठार

सोपोरमध्ये 45 तोफगोळे जप्त

दुसरीकडे, काश्मीरमधील सोपोर येथे शोधमोहीमेदरम्यान एका घरात ठेवलेले तब्बल 45 तोफगोळे जप्त करण्यात आले. ही कारवाई सोपोर पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि लष्कराच्या 5 राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाने शीर कॉलनी परिसरात केली. जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी सुरू असून ते तिथे कसे आले, याचा सखोल तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news