

Pooja Khedkar inquiry Delhi Police
पुढारी ऑनलाईन डेस्क : यूपीएससी (UPSC) कडे मी नावात बदल केल्याचे गॅझेट सादर केले आहे. मी कोणतीही बनावट कागदपत्रे सादर केलेली नाहीत. माझी सगळी कागदपत्रे खरी आहेत. तरीही मला नोकरीतून काढून टाकले आहे. त्याविरोधात मी कॅटमध्ये (CAT) अपील केले आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी मला बोलवल्यास मी येईल. मी तपासात आज (दि.२) पूर्णपणे सहकार्य केले, असे बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी सांगितले.
पूजा खेडेकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (दि.२) पूजाची चौकशी केली. त्यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पूजा खेडकर म्हणाल्या की, माझ्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत चुकीची माहिती माध्यमांना देण्यात आली. मी सगळी खरी कागदपत्रे सादर केली आहेत. मी देश सोडून दुसऱ्या देशात गेल्याच्या बातम्या होत्या. पण त्या निराधार असून मी भारत सोडलेला नाही. मला न्याय मिळेल, असा विश्वास आहे.
माझे अटेम्पट (Attempt) संपले, असा आरोप केला जात आहे. पण तसे काही नाही, मी योग्य वेळेत परीक्षा दिली आहे. १२ डॉक्टरांनी माझ्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत लढणार असून मला न्याय मिळेल, याची खात्री आहे.
परीक्षेबाबत मी सगळी प्रोसेस फॉलो केली आहे. त्यात कुठलीही गडबड माझ्याकडून झालेली नाही. परीक्षा देताना मी कधीही नाव बदलले नाही. मी फक्त माझ्या आईचे नाव त्यात अॅड केलेले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या नावात आईचे नाव लावले आहे. यूपीएससी (UPSC) कडे सगळी माहिती असते. मी नावात बदल केल्याचे गॅझेट सादर केले आहे. मला नोकरीतून काढून टाकले आहे. त्याविरोधात मी कॅटमध्ये (CAT) अपील केले आहे.