Mann Ki Baat | पीएम मोदींची ‘या’ तारखेला पुन्हा ‘मन की बात’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा 'मन की बात' (Mann Ki Baat) हा रेडिओ कार्यक्रम पुन्हा सुरु होत आहे. हा कार्यक्रम ३० जून रोजी प्रसारित होईल. याबाबतची माहिती स्वतः पीएम मोदी यांनी मंगळवारी X वर पोस्ट करत दिली.

पीएम मोदी यांचा 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम महिन्यातील शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. हा कार्यक्रम पहिल्यांदा ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरु झाला होता. पीएम मोदी यांनी मंगळवारी (दि. १८ जून) जाहीर केले की त्यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' ३० जून रोजी प्रसारित होईल.

पीएम मोदींनी त्यांच्या रेडिओ कार्यक्रमासाठी लोकांना त्यांच्या कल्पना आणि इनपुट्स MyGov Open Forum, नमो ॲपद्वारे अथवा 1800 11 7800 वर रेकॉर्ड केलेल्या संदेशाद्वारे शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

पीएम मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम २५ फेब्रुवारी रोजी शेवटचा प्रसारित झाला होता. त्यानंतर हा कार्यक्रम लोकसभा निवडणुकीमुळे थांबवण्यात आला होता.

"लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मन की बात' कार्यक्रम पुढील तीन महिने प्रसारित होणार नाही," असे पीएम मोदींनी ११० व्या कार्यक्रमावेळी सांगितले होते. 'मन की बात' हा पीएम मोदींचा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात ते देशातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात आणि जनतेशी संवाद साधतात.

'मन की बात'विषयी….

३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू करण्यात आलेल्या 'मन की बात'चे उद्दिष्ट देशातील विविध घटकांशी जोडण्याचे आहे. हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो. २२ भारतीय भाषा आणि २९ बोलींव्यतिरिक्त, 'मन की बात' कार्यक्रम फ्रेंच, चायनीज, इंडोनेशियन, तिबेटन, बर्मी, बलुची, अरबी, पश्तो, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यासह ११ परदेशी भाषांमध्ये प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे प्रसारित होतो. 'मन की बात'च्या प्रभावावरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की सुमारे १०० कोटी लोक किमान एकदातरी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत.

हे ही वाचा ;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news