

PM Modi Google AI Hub :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४ ऑक्टोबर) विशाखापट्टणममध्ये गुगल AI हब लाँच केलं. त्यांनी विकसीत भारताच्या दृष्टीकोणातून हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट देखील केली. ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 'विशाखापट्टणम सारख्या डायनामिक शहरातून Google AI Hub ची सुरूवात करताना आनंद झाला. यात गिगावॅट स्केल डाटा सेंटरसह अनेक प्रकल्पामध्ये गुतवणूक होणार आहे. हा प्रोजेक्ट विकसीत भारत निर्माण करण्याच्या आपल्या स्वप्नाशी जुळणारा आहे.
तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी हे AI hub मोठी भूमिका निभावेल आणि सरकारचं सर्वांसाठी AI हे धोरण पुढं नेईल असा विश्वास पंतप्रधानांना बोलून दाखवला. ते म्हणाले, 'हे हब तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाची शक्तीशाली ताकद ठरेल, त्याचबरोबर सर्वांसाठी AI धोरण देखील पुढं नेईल. आपल्या नागरिकांना कटिंग एज टूल्स पुरवले जातील. त्यामुळं आपली डिजीटल इकॉनॉमीला बूस्ट मिळेल आणि जगातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेतृत्व करणाऱ्यांमध्ये भारताचं स्थान निश्चित होईल.'
दरम्यान, आज गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी विशाखापट्टणम इंथ सुरू झालेल्या गुगल कंपनीच्या पहिल्या गुगल AI हबची माहिती दिली. पिचाई यांनी देखील सोशल मीडिया पोस्ट केली. ते म्हणतात, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करून खूप चांगलं वाटलं. आम्ही विशाखापट्टणम इथं कंपनीच्या पहिल्याच गुगल एआय हबची माहिती दिली. हा एक मैलाचा दगड आहे.
ते पुढे म्हणाले, 'या हबमध्ये गिगावॅट स्केल कॉम्पुटर कपॅसिटी, नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे आणि उच्च स्तरावरील उर्जा इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश असणार आहे. आम्ही आमच्या कंपनीची इंडस्ट्री लिडिंग टेक्नॉलॉजी भारतात आणत आहोत. यामुळं आर्टिफिशल इंटेलिजेन्स नवीन उपक्रमांना चालना मिळणार आहे याचबरोबर देशाच्या विकासासाठी देखील हे महत्वाचं ठरणार आहे.
गुगलनं आज जाहीर केलं की ते येत्या पाच वर्षात देशात १५ बिलियन युएस डॉलर गुंतवणूक करणार आहेत. एक गिगावॅट स्केल AI हबचं विशाखापट्टणम येथील हे AI हब गुगल कंपनीचं सर्वात मोठं अमेरिकेबाहेरचं AI हब ठरणार आहे. गुगलनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या भारत की शक्ती या कार्यक्रमात ही घोषणा केली.