PM Modi Congratulates Keir Starmer | पीएम मोदींकडून कीर स्टार्मर यांचे अभिनंदन, दिले भारत भेटीचे निमंत्रण

कीर स्टार्मर यांनी स्वीकारला ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार
PM Modi Keir Starmer
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी चर्चा केली. (X accounts)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

ब्रिटनमधील संसदेच्या निवडणुकीत कीर स्टार्मर यांच्या नेतृत्त्वाखालील लेबर पार्टीने सत्ता मिळवली आहे. यामुळे कीर स्टार्मर (वय ६१) हे ब्रिटनचे ५८ वे पंतप्रधान बनले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीर स्टार्मर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. (PM Modi Congratulates Keir Starmer)

PM Modi Keir Starmer
UK general election | 'ब्रिटनमध्ये हिंदूफोबियाला जागा नाही' म्हणत कीर स्टार्मर यांनी हिंदूंची मते कशी मिळवली?

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी चर्चा केली. ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल आणि निवडणुकीत लेबर पार्टीच्या उल्लेखनीय विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. पीएम मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांना लवकरच भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे.'' अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने (PMO) X वर पोस्ट करत दिली आहे.

'भारत- ब्रिटन आर्थिक संबंध मजबुतीसाठी वचनबद्ध'

कीर स्टार्मर यांच्याशी बोलून आनंद झाला. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आम्ही सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणि मजबूत भारत- ब्रिटन द्विपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही आमच्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आणि जागतिक हितासाठी वचनबद्ध आहोत, असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे.

इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचेही अभिनंदन

सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियान इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहे. त्याबद्दल पेझेश्कियान यांचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मसूद पेझेश्कियान यांचे अभिनंदन. आमच्या लोकांच्या आणि देशाच्या हितासाठी आमचे दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत, असे मोदी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

PM Modi Keir Starmer
UK General Election | कोण आहेत कीर स्टार्मर?; ज्यांनी दिला ऋषी सुनाक यांना धक्का

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news