लक्ष्‍यपूर्ती हाच भारतीयांचा ध्यास : पंतप्रधान मोदी

PM मोदींनी मॉस्कोमध्ये केले भारतीय समुदायाला संबोधित
PM Narendra Modi
मॉस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना PM मोदी file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था बनवली आहे. आज भारतीय भविष्‍याचा वेध घेत प्रगतीसाठी झेपावत आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. भारतीय लक्ष्‍यपूर्तीसाठी कठोर परिश्रम करत असून लक्ष्यपूर्ती हाच भारतीयांचा ध्यास असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.९) रशियातील मॉस्को येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.

लक्ष्‍यपूर्तीसाठी भारतीयांचे कठोर परिश्रम

आजचा भारत नव्या उंचीला स्पर्श करत आहे. आज १४० कोटी भारतीय अनेक दशकांपासून सुरू असलेल्या समस्या सोडवण्यावर विश्वास ठेवतात. भारतीय लक्ष्‍यपूर्तीसाठी कठोर परिश्रम करत आहेत. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. भारतीय संकल्प करतात आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. भारतीयांच्या समर्पण, परिश्रम आणि समर्पणामुळे हे शक्य होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi
Sharad Pawar: शरद पवारांच्या 'पक्षा'ला निवडणूक आयोगाची मान्यता

'जग म्हणतंय भारत बदलत आहे'

'जेव्हा भारत G20 सारख्‍या परिषदेचे आयोजन करतो, तेव्हा जग म्हणते,' भारत बदलत आहे.' भारताने १० वर्षात आपल्या विमानतळांची संख्या दुप्पट केली. भारत सरकारने ४० हजार किमीहून अधिक रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले तेव्हा जगालाही भारताची ताकद कळते. देश बदलत आहे असे त्यांना वाटते. आज भारत डिजिटल पेमेंटचा विक्रम करत आहे. भारत जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधतो. आज जेव्हा सर्वात उंच पुतळा बांधला जातो तेव्हा जग म्हणतं की भारत बदलत आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

'भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम'

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, 'सरकारच्या अनेक उद्दिष्टांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा आकडा येणे हा देखील योगायोग आहे. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तिसऱ्या टर्ममध्ये गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधण्याचे आणि तीन कोटी गरीब महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचेही सरकारचे उद्दिष्ट आहे. जी उद्दिष्टे ठेवतात ती आजचा भारत साध्य करतो. आज भारत हा असा देश आहे ज्याने चंद्रावर चांद्रयान पाठवले आहे, जिथे जगातील कोणताही देश पोहोचला नाही. जगाला डिजिटल व्यवहारांचे सर्वोत्तम मॉडेल देत आहे. उत्कृष्ट सामाजिक क्षेत्रातील धोरणांद्वारे आपल्या नागरिकांना सक्षम बनवत आहे. आज भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम असलेला देश असल्‍याचे मोदींनी सांगितले.

PM Narendra Modi
मणिपुरात जे घडलं तसं कोठेही घडलं नाही : राहुल गांधी

तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट ताकदीने काम करेन

मी माझ्यासोबत भारताच्या मातीचा सुगंध आणला आहे. माझ्यासोबत १४० कोटी भारतीयांचे प्रेम घेऊन आलो आहे. तिसऱ्यांदा सरकारवर आल्यानंतर माझा भारतीय समुदायाशी पहिला संवाद येथे मॉस्कोमध्ये होत आहे, हे अतिशय आनंददायी आहे. आजपासून एक महिन्यापूर्वी ९ जून रोजी मी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट ताकदीने काम करेन, अशी प्रतिज्ञा केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news