Nepal India Relation: नेपाळशिवाय आमचे राम अपूर्ण; मोदींनी केली अयोध्या पासून जनकपूर सरयू-कमला एक्सप्रेसची घोषणा

Saryu Kamala Express Ayodhya To Janakpur: नेपाळला पुरामधून सावरण्यासाठी भारताने २४ हजार कोटी नेपाळी रूपयांचे पॅकेज देखील जाहीर केले.
Nepal India Relation
Nepal India Relationpudhari
Published on: 
Updated on: 

Saryu Kamala Express Ayodhya To Janakpur: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह आज द्विपक्षीय चर्चेसाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांचे स्वागत केले. तसेच संयुक्त पत्रकार परिषदेत अनेक उपक्रमांची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळशिवाय आमचे धाम आणि राम अपूर्ण असल्याचं वक्तव्य केलं. त्यांनी नेपाळसाठी २४ हजार कोटी नेपाळी रूपयांचे पॅकेज देखील जाहीर केलं. याचबरोबर अयोध्या पासून जनकपूर पर्यंत सरयू-कमला एक्सप्रेसची देखील घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये आयआयटी सुरू करणार असल्याची देखील घोषणा यावेळी केली.

Nepal India Relation
Nepal PM India Visit: नेपाळला उपरती... पंतप्रधान बालेन शाह यांच्याकडून पहिल्याच परदेशी दौऱ्यासाठी 'संकटमोचक' भारताची निवड

पॅकेजची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात सांगितलं की, ‘मी पंतप्रधान बालेन यांच्याशी बोलताना त्यांच्या नेपाळबाबत असलेले व्हिजन आणि कमिटमेंट दोन्ही जाणीव झाली. नेपाळच्या जनतेने जो ऐतिहासिक जनादेश दिला आहे. त्यावरून नेपाळच्या नव्या पिढीची आशा दिसते. भारत समृद्ध नेपाळच्या विकासाच्या प्रवासात कायमच सहभागी राहिला आहे. या भावनेने आम्ही आपले संबंध एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी अनेक निर्णय घेतला आहेत.

भारत आणि नेपाळ यांचे नाते फक्त शेजारी असं नाही तर ते एका अटूट विश्वासाचे नाते देखील आहे. आमचा आनंद आणि आव्हाने दोन्ही संयुक्त आहेत. नेपाळमध्ये पुरात झालेल्या जीवित हानीबद्दल आम्हाला सहवेदना आहे. आम्ही २४ हजार कोटी नेपाळी रूपयांचे (१४,९९३ हाजर कोटी भारतीय रूपये) विकास पॅकेजची घोषणा करतोय. आम्ही प्रभावित कुटुंबाचे जीवन पुन्हा सुरळित करण्याचा संकल्प करतोय.

Nepal India Relation
India Nepal border dispute |"सीमावादात तिसऱ्या पक्षाची गरज नाही' :नेपाळच्या पंतप्रधानांना भारताने सुनावले खडे बोल

आमचे राम नेपाळशिवाय अपूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचे राम हे भारत आणि नेपाळ यांचा संबंध हा एकत्रित इतिहास, संस्कृती, पीपल टू पीपल कनेक्ट यातून तयार झाला आहे. भगवान राम आणि माता सीता आमच्या एकत्रित संस्कृती आि आस्थेची ओळख आहे. २०१८ मध्ये जनकपूरच्या पावन धरतीवरून मी सांगितलं होतं की नेपाळशिवाय आमचे धाम अपूर्ण आहेत. नेपाळशिवाय आमचे राम देखील अपूर्ण आहेत. २०२४ मध्ये अयोध्यामध्ये रामलला यांची प्राण प्रतिष्ठा झाली. त्यानंतर करोडो भाविक अयोध्या येत आहेत. २०२५ मध्ये देश आणि जगातून ३० कोटी भाविकांनी अयोध्येची यात्रा केली आहे. आज सुरू करण्यात आलेली ट्रेन सेवा सरयू कमल एक्सप्रेसने आमच्या नात्याला एख वेगळा आयाम दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळशी बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातील सीमेद्वारे देखील कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे देखील प्रयत्न केले जातील असं सांगितलं.

Nepal India Relation
Nepal India border dispute|नेपाळच्‍या पंतप्रधानांची पुन्‍हा नसती उठाठेव; 'लिपुलेख खिंडी' वादात ब्रिटनसह चीनलाही ओढले!

नेपाळमध्ये IIT

मोदींनी आपल्या संबोधनात पुढे सांगितलं की, ‘आम्ही नेपाळमध्ये स्टार्टअप इन्क्युबेटर, इनोवेशन हब आणि आयआयटी स्थापन करणार आहोत. आम्ही नेपाळी विद्यार्थ्यांना भारतात कायदा आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठीची स्कॉलरशिपच्या संधी वाढवणार आहोत. फूड प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू एडिशन यांना चालना देण्यासाठी नेपाळमध्ये अॅग्रो इंडस्ट्रीयल पार्क विकसित करण्यास देखील आम्ही मदत करणार आहोत.

Nepal India Relation
India Nepal border tax relief | भारत-नेपाळ सीमेवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा; टॅक्स नियमाला नेपाळ सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

बालेन शाह यांनी मानला आभार

बालेन शाह यांनी अडचणीच्या काळात सर्वात आधी भारतच पुढे आला होता. त्यासाठी त्यांचे आभार मानतो. शाह म्हणाले, ‘आमचे संबंध पहिल्यापासूनच मजबूत राहिले आहेत. भारत आणि विकास यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सहकार्य वाढवत आहे. यामुळे आमच्या देशात देखील रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. बालेन शाह यांनी सांगितलं की, परस्पर सन्मान, विश्वास आणि सतत सद्भावना भारत आणि नेपाळ यांच्या द्विपक्षीय संबंधांचा पाया आहे. भारत आणि नेपाळ यांचे संबंध हिमालयासारखे मजबूत आणि महासागराएवढे विशाल आहेत. आम्ही एकमेकांच्या सहयोगाने आपल्या संस्कृतीचा विस्तार करणार आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.