

PM Modi interacts with soldiers on the border
दिल्ली: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींनी थेट सीमेवर जावून, भारतीय लष्करातील जवानांशी आज (दि.१३) भेट घेत, संवाद साधला आहे. या संदर्भातील वृत्त फोटोंसह 'ANI'ने दिले आहे.
एएनआयने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आज (दि.१३) सकाळी पंतप्रधान मोदी पंजाबमधील आदमपूर हवाई तळावर गेले. यावेळी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोदींना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी येथील शूर जवानांशी संवाद साधला". यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुठ आवळून सशस्त्र दलातील जवानांसोबत 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या.
पंतप्रधान मोदींनी 'X' वर भेटीशी संबंधित काही छायाचित्रे शेअर केली. त्यांनी लिहिले की, 'आज सकाळी मी एअर फोर्स स्टेशन आदमपूरला भेट दिली आणि आमच्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांची भेट घेतली'. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या लोकांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत त्यांचा सदैव ऋणी राहील.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यामध्ये २६ निष्पाप भारतीय पर्यंटकांना दहशतवाद्यांकडून मारण्यात आले. यानंतर दहशतवादाला अद्दल घडवण्यासाठी भारतीय लष्कर तत्पर झाले आहे. मागील काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले, यावेळी भारतीय लष्करांने प्रत्येक हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट सीमेवरील भारतीय लष्करातील जवानांशी आज संवाद साधला आहे. भारत-पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांची घेतलेली भेट महत्त्वाची आहे.
भारताने दहशवाद आणि त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानविरोध 'ऑपरेशन सिंदूर' राबविले. यामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला. दरम्यान भारताच्या लष्करातील जवानांची दाखलवेल्या शौर्य आणि पराक्रमामुळे हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्थ झाले. या पार्श्वभूमीवर पीएम मोदींची जवानांची घेतलेली भेट जवानाचा उत्साह वाढवणारी आहे.
पंजाबमधील आदमपूर एअरबेस हा भारताच्या मिग-29 लढाऊ विमानांचा तळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअरबेसला भेट देऊन हे दाखवून दिलं की हा तळ पूर्णतः कार्यक्षम आहे. आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान मोदींसोबत एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह देखील उपस्थित होते. हा एअरबेस पाकिस्तानच्या सीमेच्या जवळ स्थित असल्यामुळे शत्रूवर जलद कारवाई करणे शक्य होते.