

Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर कसे राबवले याची माहिती लष्करी संचालनाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी एअर मार्शल ए.के. भारती आणि व्हाइस ॲडमिरल ए.एन. प्रसाद यांनी सोमवारी (१२ मे) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजीव घई यांनी भारतीय हवाई दलाची शक्ती आणि अचूकता स्पष्ट करण्यासाठी १९७० मधील क्रिकेटमधील बहुचर्चित आणि स्मरणीय अशा ॲशेस मालिकेचे उदहारण दिले. यावेळी त्यांनी विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीचा संदर्भ देत भारताच्या लष्कराच्या तिन्ही दलांनी आपली मजबूत पकड कशी राखली आहे, याची सविस्तर माहिती दिली.
सुरुवातीलाच राजीव घई म्हणाले की, मी पाहिलं की विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे; अनेक भारतीयांप्रमाणे तो माझाही एक आवडता खेळाडू आहे. यानंतर त्यांनी स्पष्ट केली की, भारताच्या हवाई तळांवर आणि पुरवठा विभागावर हल्ला करणं खूप कठीण आहे. मला वाटतं मी इथे क्रिकेटचं उदाहरण द्यावं. ७० च्या दशकात मी शाळेत होतो. त्यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशेस मालिका खेळली जात होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे दोन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन आणि डेनिस लिली हे खूपच खूप लोकप्रिय होते. कारण त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजीची धूळधाण उडवली होती. यावरुन ॲशेस टू ॲशेस अशी एक म्हण तयार झाली होती. भारताच्या संरक्षण यंत्रणेकडे पाहिलं, तर लक्षात येईल की तीही अशाच प्रकारे काम करते. शत्रूने बर्याच सुरक्षा पातळ्या पार केल्या तरी एकतरी यंत्रणा त्यांना लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पाडेल.", असेही घई यांनी यावेळी स्पष्ट केले.
लष्करी संचालनाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी ज्या ॲशेस मालिकेचे उदहारण दिले ती मालिका १९ नोव्हंबर १९७४ रोजी ब्रिस्बेनमधॅल गॅबा स्टेडियमवर झाली होती. यापूर्वीची ऍशेस मालिका इंग्लंडने जिंकली होती. गॅबावरील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होती, जिथे बॉब विलिस आणि माईक हेंड्रिकसारख्या गोलंदाजांनी पूर्ण ताकदीने गोलंदाजी केली. या सामन्यात टोनी ग्रेग याने डेनिस लिली एक बाउन्सर टाकला. हा इतका भेदक होता की, चेंडू थेट लिलीच्या डोक्यावरुन झेपावला. लिली फक्त चेंडूकडे पाहिले आणि "लक्षात ठेव, हे सगळं सुरू कोणी केलंय", असा इशाराच टोनी ग्रेग याला दिला. जगातील क्रिकेटच्या इतिहासातलं डेनिस लिलीच विधान हे 'बाउन्सर वॉर' मानले गेले. ऑस्ट्रेलियाचा डाव ३०९ धावांत संपला.
चॅपेलने लिली आणि ग्रेग यांच्यातील घडलेल्या घटनेविषयी काहीच ऐकलं नव्हतं; पण त्याच्या लक्षात आलं की, लिली प्रचंड संतापला आहे. त्याचा राग संघाच्या फायद्यासाठी वापरता येऊ शकतो असा विचार त्याने केले. इंग्लंडचे सलामीवीर डेनिस अमिस आणि ब्रायन लकहर्स्ट लंदाजीसाठी उतरले. लिली त्यावेळी बाउन्सरचा वापरणारा गोलंदाज नव्हता. पण त्या दिवशी त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी बाउन्सर टाकले. चॅपेलला नेमकं काय घडलं हे माहित नव्हतं, पण त्याला हे समजलं की काहीतरी विशेष आहे, म्हणून त्याने लिलीबरोबरच दुसऱ्या बाजूने जेफ थॉमसन भेदक मारा सुरु ठेवला. याचा लक्षणीय फायदा ऑस्ट्रेलियाच्या संघाला झाला. हे उदाहरण देताना लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करुन संघर्षाची पाकिस्तानने सुरुवात केली असली तरी याचा शेवट आम्ही करु, असे स्पष्ट केले.