Putin's India visit: PM मोदींनी पुतिन यांना रशियन भाषेत श्रीमद्भगवद्गीता भेट दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेतील भगवद्गीतेची प्रत भेट दिली.
Putin's India visit
Putin's India visitfile photo
Published on
Updated on

Putin's India visit highlights:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेत लिहिलेल्या भगवद्गीतेची प्रत भेट दिली. ही भेट दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान झाली, ज्यामुळे भारत-रशिया संबंधांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जोडणीचा एक नवा आयाम मिळाला आहे.

Putin's India visit
Vladimir Putin | भारत कोणत्याही देशापुढे झुकत नाही

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गीतेचे ज्ञान आणि संदेश जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरणा देतो आणि तिची शिकवण प्रत्येक युगात मानवतेला योग्य दिशा दाखवते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी मोदींनी स्वतः केलेली तयारी आणि उपस्थिती याबद्दल क्रेमलिनने एक निवेदन जारी केले आहे. क्रेमलिनने म्हटले आहे की, पीएम मोदींनी विमानाजवळ जाऊन पुतिन यांना भेटण्याचा निर्णय अनपेक्षित होता आणि रशियन अधिकाऱ्यांना त्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा आहे.

माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करताना आनंद होत आहे: मोदी

रशियन राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केल्यानंतर पीएम मोदींनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे दिल्लीत स्वागत करताना मला आनंद होत आहे. मी आज संध्याकाळी आणि उद्या होणाऱ्या आमच्या बैठकांसाठी उत्सुक आहे. भारत आणि रशियाची मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे; यामुळे आपल्या लोकांना खूप फायदा झाला आहे."

Putin's India visit
India Russia Summit |भारत-रशिया शिखर परिषदेपूर्वी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची भेट

पुतिन यांचा आजचा कसा असेल दौरा?

भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवन येथे औपचारिक स्वागत केले जाईल. यानंतर पुतिन राजघाटला जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर ते हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरावरील चर्चांमध्ये सहभागी होतील. शिष्टमंडळांच्या बैठकीत काही प्रमुख उद्योगपती देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

आज मोदी आणि पुतिन भारत-रशिया बिझनेस फोरममध्ये भाग घेतील. त्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावरून पुतिन राष्ट्रपती भवनातील भोजनात सहभागी होतील. यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन मॉस्कोसाठी रवाना होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news