PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार; पीएम-किसानचा २४ वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM-किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, २,००० तुमच्या खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या पात्रता, e-KYC आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स.
PM Kisan 24th installment
PM Kisan 24th installmentfile photo
Published on: 
Updated on: 

PM Kisan 24th Installment

नवी दिल्ली: दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या सणाची तयारी सुरू असताना, शेतकरी 'पीएम किसान सन्मान निधी'च्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी उपलब्ध माहितीवरून असे दिसून येते की २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे. २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी, सरकार दरवर्षी ६,००० रुपयांची मदत देते, जी तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.

PM Kisan 24th installment
Uddhav Thackeray Dasara Melava 2026: "भगवा लाल किल्ल्यावर फडकवायचाय, कितीही दरोडेखोर येऊ देत..."; उद्धव ठाकरेंनी तोफ डागली!

दोन हप्त्यांच्या दरम्यान चार महिन्यांचे अंतर असते आणि हा कालावधी २० ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

या योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्याच्या नावावर शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे आणि त्यांनी अनिवार्य 'ई-केवायसी' पूर्ण केलेले असावी. कुटुंबातील एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ मिळतो. अनुदान मिळवण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, जमिनीची पडताळणी होणेही अनिवार्य आहे.

कोण पात्र नाही?

जे शेतकरी प्राप्तिकर भरतात, ते या योजनेसाठी पात्र नाहीत. केंद्र किंवा राज्य सरकारचे कार्यरत किंवा निवृत्त अधिकारी/कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. नोंदणीकृत व्यावसायिक जसे की डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि वास्तुविशारद देखील या योजनेसाठी अपात्र आहेत. याशिवाय, ज्या पेन्शनधारकांना दरमहा १०,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन मिळते, त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे.

PM Kisan 24th installment
PM Modi Dussehra speech: रावणदहनानंतर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान; म्हणाले, "देशाच्या ३ शत्रूंविरुद्ध आता एकत्र लढावेच लागेल"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news