Uddhav Thackeray Dasara Melava 2026: "भगवा लाल किल्ल्यावर फडकवायचाय, कितीही दरोडेखोर येऊ देत..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आज विजयादशमीच्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेचा ६० वा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे.
Uddhav Thackeray Dasara Melava 2026
Uddhav Thackeray Dasara Melava 2026File Photo
Published on: 
Updated on: 

Uddhav Thackeray Shiv Sena Dasara Melava 2026:

मुंबई : "शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हातात दिलेला पवित्र भगवा फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेवर नाही, तर लाल किल्ल्यावर फडकवायचा आहे. निशाणीचा झेंडा वेगळा ठेवा, पण अजून कितीही दरोडेखोड येऊदेत, पण आमचा भगवा कोणी चोरू शकत नाही," असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

"भाजपने आतापर्यंत केलेला सर्वात मोठा घोटाळा म्हणजे संभ्रम घोटाळा आहे. खुर्ची टिकवण्यासाठी गद्दारांना ५० कोटी देता आणि ज्यांच्यामुळे पोटात घास जातो त्यांना ५ हजार रुपये देता, अशी टीका ठाकरे यांनी सरकारवर केली. आज विजयादशमीच्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेचा ६० वा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray Dasara Melava 2026
PM Modi Dussehra speech: रावणदहनानंतर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान; म्हणाले, "देशाच्या ३ शत्रूंविरुद्ध आता एकत्र लढावेच लागेल"

'५ हजारांची घोषणा म्हणजे उपकार केले नाही'

"दुष्काळ फार मोठा अक्राळ-विक्राळ आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिना असं हे सरकार आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीत मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठं पॅकेज म्हणून घोषणा केली होती. पण किती जणांना मिळाली मदत? आता सुद्धा ५ हजारांची घोषणा केली आहे. पण हे काय उपकार नाही केले. नमो किसान योजनेचे दोन हप्ते आलेले नाहीत. ते येणं बाकी आहेत आणि ५ हजार शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकत आहेत. दुष्काळाची पाहणी करायला केंद्रीय पथक येऊन गेले त्यांनी काय पाहिलं, किती पंचनामे केले, मदत कधी आणि किती येणार हे कोणालाच माहीत नाही. कर्जमाफी जाहीर केली, पण किती जणांना झाली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

"टायगरला बघायला चमको गेले"

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "टायगर श्रॉफवर हल्ला झाला तेव्हा हे चमको लगेच भेटायला गेले. टायकरचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. नवरात्र सुरू आहे. कसल्या नाकाबंदी करता, पोलिसांना ते शस्त्र घेऊन आलेले दिसले नाहीत का? हे शौर्यपदक देऊन गौरवण्याची गोष्ट नाही आहे. जेव्हा शस्त्र घेऊन आले तेव्हा ते तुम्हाला कळायला पाहिजे होते आणि तिकडेच तुम्ही त्यांना उडवायला पाहिजे होतं. तरच मी कायद्याचं राज्य आहे असे म्हणेन," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हटवलेले १३ कोटी मतदार बांगलादेशी होते का?

"नीटचा पेपर फुटला म्हणून मुलं रस्त्यावर उतरली. आतासुद्धा त्यांचा अधिकार आहे, कारण मतचोरी सगळ्यांची होत आहे. विशेषत: नवीन मतदारांच्या बाबतीत हा प्रकार जास्त होत आहे. जो अन्यायाविरूद्ध पेटून उठत नाही त्याने शिवरायांचं नाव घेऊ नये. आपल्या देशात जवळपास १३ कोटी नागरीकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला. हे बांगलादेशी होते का? मतचोरी होत असताना आम्ही गप्प बसायचं का? म्हणून आम्ही तख्तपालट करायला बसलो आहे. मुलांना समजून घेतले नाहीत तर परिस्थीती वाईट होईल," असा इशारा ठाकरे यांनी दिला.

"संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थीती"

"मुख्यमंत्र्याना आव्हान करतो की, आंदोलनात येणाऱ्या तरूणांच्या घरात पोलीस पाठवून नोटीसा पठवण्यापेक्षा जे मारेकरी येऊन गोळीबार करून जातात त्यांना पकडा, ते अतिरेकी आहेत. रस्त्यावर न्याय मागण्यासाठी उतरणारे तरूण नक्षलवादी नाहीत, ते त्यांचे हक्क मागत आहेत, ते क्रांतीकारी आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची परिस्थिती पुन्हा येत आहे. अमित शहा मुंबईत येऊन महाराष्ट्र देशातील सर्वात मोठं बहुभाषीक राज्य आहे, असे म्हणाले. त्यावेळी सत्तालंपटांनी ताडकन उठून सांगायला पहिजे होतं की, हा मराठी माणसाच्या हक्काचा महाराष्ट्र आहे. पण हे लक्षात ठेवा मराठी माणसाने रक्त सांडलं म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली," असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

"आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याच नाही"

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "आमच्या हातून भगवे कोणू खेचून घेऊ शकत नाही. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याच नाही. आमचं हिंदुत्व देशभक्तीचं आहे. आज धर्माच राजकारण सुरू आहे. आज राजाला धर्माचा आधार लागतो. हाताला नाही काम आणि बोल जय श्री राम असा प्रकार सुरू आहे. भाजप तिरंग्यातील रंग वेगळे करत आहे. पण आपण सर्व मिळून तिरंगा आहोत."

Uddhav Thackeray Dasara Melava 2026
Eknath Shinde Dasara Melava : मागच्या दाराने येऊन जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला; खरी वोटचोरी २०१९ मध्येच झाली : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा घणाघात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news