PM Kisan 20th Installment | किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता 'या' दिवशी येऊ शकतो; पण त्याआधी शेतकऱ्यांना 'हे' काम करावे लागेल

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार, जाणून घ्या सविस्तर
PM Kisan 20th Installment
पीएम किसान सन्मान निधी योजना.(Pudhari Photo)
Published on
Updated on

PM Kisan 20th Installment

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. जूनच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यात २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारकडून किसान सन्मानचा हप्ता नेमका कधी जमा होणार? याची तारीख सांगण्यात आलेले नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार, २० जून दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे मानले जात आहे.

पीएम किसान सन्मान निधी ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतर्गंत देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ३ हप्त्यांत ६ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये जमा केले जातात.

PM Kisan 20th Installment
Agristack Registration: राज्यात ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ अंतर्गत शेतकरी नोंदणीचा 1 कोटीचा टप्पा ओलांडला

शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाईटवर लक्ष ठेवावे. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर येणारे एसएमएसदेखील चेक करत राहावेत. जेणेकरुन किसान सन्मान निधीचा हप्ता कधी जमा होणार? याची माहिती मिळेल.

e-KYC पूर्ण करा

जर शेतकऱ्यांनी ई- केवायसी (e-KYC) केली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो. त्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन OTP च्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच बायोमेट्रिक केवायसीदेखील करु शकता.

  • शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in वर भेट द्यावी

  • तेथे गेल्यावर e-KYC वर क्लिक करा

  • तुमचा आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर नमूद करा

  • ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी केल्यानंतर सबमिट करा

PM Kisan 20th Installment
E-KYC of Ration Card Holders | 619 लाभार्थ्यांची ई- केवायसी बाकी

तुमचे नाव पीएम किसान लाभार्थी यादीत असे चेक करा

  • पीएम किसान सन्मान निधीच्या pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे

  • Beneficiary List वर क्लिक करा

  • त्यानंतर तुमचा जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा

  • Get Report वर क्लिक करुन तुमचा रिपोर्ट मिळवा

  • स्क्रिनवर तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल, त्यात तुमचे नाव आहे की नाही हे पाहा.

याआधी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी केला होता. याद्वारे देशातील सुमारे ९.८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे २२ हजार कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली होती. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांमध्ये २.४१ कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश होता.

या योजनेच्या नियमित वितरण वेळापत्रकाप्रमाणे, फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर या महिन्यात हप्ता जारी करण्यात येतो. यामुळे आता शेतकऱ्यांना २० व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news