E-KYC of Ration Card Holders | 619 लाभार्थ्यांची ई- केवायसी बाकी

Nashik News | 99.9८ टक्के शिधापत्रिकाधारकांची नोंदणी पूर्ण
E-KYC of Ration Card
E-KYC of Ration CardPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत वर्षभरात चार वेळा मुदतवाढ दिल्यानंतर जिल्ह्यातील 99.9८ टक्के शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी पूर्ण करण्यात आली. आता केवळ ६१९ लाभार्थ्यांची नोंदणी बाकी असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत केंद्र सरकारतर्फे प्राधान्य रेशनकार्डधारक आणि अंत्योदय योजनेतील लाभधारकांना महिन्याला अन्नधान्याचा लाभ दिला जातो. राज्यातील सुमारे साडेसहा कोटी लाभार्थी दर महिन्याला अन्नधान्याचा लाभ घेतात. समाजातील गरीब जनतेला अन्नधान्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणली आहे. योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थीला लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने ई- केवायसी करण्याचे निश्चित केले. त्यानुसार मागील वर्षभरापासून लाभधारकांची ई- केवायसी करण्यात येत आहे. नोंदणी नसलेल्या लाभार्थींचे धान्य थांबविण्याचा इशाराही शासनाने दिला होता. मात्र, वारंवार आवाहन करूनही बहुतांश लाभार्थींकडून नोंदणीकडे पाठ फिरवली गेली परिणामी शासनाने आधार नोंदणीसाठी चारवेळा मुदतवाढ देतानाच ३१ मेपर्यंत १00 टक्के नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हापुरवठा विभागाने अंमलबजावणी करत 99.9८ टक्के नोंदणीचा पल्ला गाठला आहे.

जिल्ह्यातील आधार नोंदणी

  • नाशिक (धाविअ)- ४,३३,099,

  • मालेगाव (धाविअ)- २,८३,१0३,

  • नांदगाव- १,८9,८१३,

  • सुरगाणा- १,४१,१9६,

  • इगतपुरी- १,७६,५9७,

  • निफाड- ३,५७,६५७,

  • बागलाण- २,७9,११४,

  • येवला- १,90,८90,

  • चांदवड- १,८२,५५9,

  • देवळा- १,१८,0४८,

  • दिंडोरी- २,४४,१६४,

  • कळवण- १,६६,११६,

  • मालेगाव- ३,09,५८७,

  • नाशिक- ३,१५,09८,

  • पेठ- १,१२,0३9,

  • सिन्नर- २,३9,२9६,

  • त्र्यंबकेश्वर- १,३१,७७५

    Nashik Latest News

जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डची संख्या आठ लाख 9८ हजार ७५0 असून, एकूण लाभार्थी ३८ लाख ७0 हजार ७७0 इतके आहेत. त्यापैकी ३८ लाख ७0 हजार १५१ लाभार्थींची नोंदणी पूर्ण झाली आहे. अद्यापही ६१९ जणांनी नोंदणी केलेली नाही. त्यांच्याबाबत शासन काय धोरण घेते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. जून महिन्यापासून संबंधितांचा धान्यपुरवठा शासन बंद करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news