PM आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही ? असा करा स्टेटस चेक

Pradhan Mantri Awas Yojana | नोंदणीची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत
Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas YojanaFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर गरीब कुटुंबांना विशेष प्राधान्य दिलं जातं. मात्र, लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादा आणि काही पात्रता अटी देखील लागू आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) अधिकृत संकेतस्थळानुसार, आतापर्यंत योजनेंतर्गत 92.61 लाख घरे पूर्ण करण्यात आली आहेत. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांमध्ये या योजनेंतर्गत गरजूंना घरे वितरित केली जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पक्कं घर नसणं आवश्यक आहे.

Pradhan Mantri Awas Yojana
PM Awas yojana: महाराष्ट्र करणार पहिले बेघरमुक्त राज्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नोंदणीची अंतिम तारीख डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही नुकतीच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि जाणून घ्यायचं असेल की, तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही? तर ऑनलाइन पद्धतीने खालीलप्रमाणे तपासता येईल.

PM आवास योजनेचा स्टेटस असा तपासा?

Assessment नंबरशिवाय स्टेटस कसा तपासाल?

PMAY ची अधिकृत वेबसाइट उघडा – https://pmaymis.gov.in

Menu > Citizen Assessment या पर्यायावर क्लिक करा

पुढे Search by Name, Mobile No. इत्यादी दोन पर्याय दिसतील

'Search by Name' हा पर्याय निवडा

त्यानंतर आपली माहिती भरा : राज्य, जिल्हा, शहर, अर्जदाराचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर

Submit बटनावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर तुमचा स्टेटस दिसेल.

Pradhan Mantri Awas Yojana
PM Awas Yojana Budget 2024 | पीएम आवास योजनेंतर्गत ३ कोटी नवी घरे

Assessment नंबर असल्यास स्टेटस कसा तपासाल?

Citizen Assessment मध्ये जाऊन Assessment ID चा पर्याय निवडा

तुमचा Assessment नंबर व मोबाईल नंबर टाका

Submit बटनावर क्लिक करा

तुमचा अर्ज मंजूर झाला का, ते स्टेटस स्क्रीनवर दिसेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news