Success Story: प्लास्टिकच्या कचऱ्याने बनवले करोडपती; वार्षिक १.५ कोटींचा टर्नओव्हर! तरूणाची नेमकी आयडिया काय?

दिल्लीतील एका तरूणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. यातून त्याने मोठा व्यवसाय सुरू केला असून त्याची वार्षिक उलाढाल कोट्यवधी रूपये आहे.
Success Story
Success Storyfile photo
Published on
Updated on

Success Story

नवी दिल्ली : प्लास्टिकचा वापर झपाट्याने वाढत आहे. पाण्याच्या बाटल्यांपासून ते कोल्ड्रिंक्सपर्यंत, सर्व काही आता प्लास्टिकपासून बनवले जाते. एकूणच, प्लास्टिक हळूहळू दैनंदिन जीवनात प्रवेश करत आहे. परिणामी, घरांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा तयार होत आहे. त्याचा पुनर्वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण अनेकदा कचरा म्हणून फेकून देणारे प्लास्टिक दिल्लीतील एका तरूणासाठी सोन्यासारखं आहे. दिल्लीतील मोहम्मद सुहेलने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन पद्धत शोधून काढली. यातून त्याने मोठा व्यवसाय सुरू केला आहे, ज्याची वार्षिक उलाढाल कोट्यवधी आहे.

Success Story
Success Business Story: IITमध्ये दोनदा नापास... 33,000 रुपयांची नोकरी सोडली, आज कमावतोय 53 लाख रुपये

सुहेलने प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी २०१९ मध्ये एथर पॅकेजिंग सोल्युशन्सची स्थापना केली. हा असा काळ होता जेव्हा कोरोनामुळे संपूर्ण जगाला घरातच राहावे लागले होते. भारतासह जगातील बहुतेक देश लॉकडाऊनमध्ये होते. याच काळात सुहेलला त्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा दिसला. तेव्हाच त्याला ते रिसायकल करण्याची कल्पना सुचली.

वार्षिक उलाढाल १.५ कोटी रुपये

सुहेल याने सांगितले की त्याच्या कंपनीने आतापर्यंत ३०० टन प्लास्टिक रिसायकल केले आहे. सध्या कंपनीची उलाढाल १.५ कोटी रुपये आहे. त्यांचे पॅकेजिंग उत्पादने ६० हून अधिक शहरांमधील ७०० डीलर्सना दिली जातात. सुहेल यांनी स्पष्ट केले की ते प्रथम कोणते प्लास्टिक रिसायकल केले जाऊ शकते हे ओळखतात. त्यानंतर ते मोठ्या कारखान्यांमधील प्लास्टिक कचरा वेगळे करतात आणि गोळा करतात. त्यानंतर ते त्यांच्या कारखान्यात आणतात, ते पूर्णपणे वितळवून त्याला नवीन आकार देण्याचा प्रयत्न करतात. त्याचा रंग देखील पूर्णपणे काढून टाकतात. हे नवीन उत्पादन इतर देशांमध्ये आणि शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते.

तयार केलेल्या उत्पादनाचेही होते रिसायकल

सुहेल याने सांगितले की, त्याच्या कारखान्यातून तयार झालेल्या उत्पादनाचेही रिसायकल करून नवीन उत्पादन बनवता येते. त्याचे म्हणणे आहे की, त्याला आपली कंपनी जगातील एक मोठी कंपनी बनवायची आहे आणि त्यासाठी तो अहोरात्र मेहनत करत आहे.

Success Story
Putin's India visit: पुतिन आणि PM मोदींनी 'मुंबईकर' टोयोटा फॉर्च्युनरने केला प्रवास; 'MH01' पासिंगची कुणाची आहे ही खास कार?

प्लास्टिक कचऱ्यातून बनणार पेट्रोल आणि डिझेल

भारतात आता प्लास्टिकच्या कचऱ्यातून पेट्रोल-डिझेल बनवण्याचे कामही सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातील मथुरेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पेटरसन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती.

या प्रकल्पांतर्गत, कारखाने आणि घरांतून निघणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याला वितळवून पेट्रोल, डिझेल आणि कार्बनमध्ये रूपांतरित केले जात आहे. प्लास्टिकपासून या प्लांटमध्ये लो डेन्सिटी ऑइल आणि हाय डेन्सिटी ऑइल तयार केले जाते. प्लांटमधून निघणारे हे तेल ट्रॅक्टर, जनरेटर आणि इंजिनच्या कामात वापरले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news