Crime News
Crime Newspudhari photo

Crime News: प्रवीण कुमार गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलमध्ये गेला! दारू, जेवण, वाद झाल्यावर शेजारीच झोपला... सकाळी वेगळीच स्टोरी आली समोर

Patel Nagar Hotel Murder: नंदग्रामच्या सेवा नगर निगममध्ये राहणारा प्रवीण कुमारने सकाळी ७ वाजता आपत्कालीन हेल्पलाईवर फोन केला होता.
Published on

Crime News Patel Nagar Hotel Murder: रोजंदारीवर काम करणाऱ्या ३४ वर्षाच्या प्रवीण कुमारनं पटेल नगर मधील एका हॉटेलमध्ये चेक-इन केलं होतं. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड देखील होती. या दोघांनी हॉटेल रूममध्ये दारू अन् जेवण केलं. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. प्रवीणला आरतीचे दुसऱ्या पुरूषासोबत संबंध आहेत असा संशय होता. वादाचे रूपांतर मारहाणीत झालं. आरती बेशुद्ध पडली. प्रवीणही तिच्या शेजारी झोपी गेला. सकाळी उठल्यानंतर प्रकरणानं वेगळंच वळण घेतलं.

Crime News
Devendra Fadnavis On Ajit Pawar: ...तर त्यांची जागा जेलमध्येच! नाही नाही म्हणत फडणवीसांनी अजितदादांच्या 'त्या' निर्णयावरून छेडलंच

आपत्कालीन हेल्पलाईवर आला फोन

ही घटना रविवारी घडली. नंदग्रामच्या सेवा नगर निगममध्ये राहणारा प्रवीण कुमारने सकाळी ७ वाजता आपत्कालीन हेल्पलाईवर फोन केला होता. त्यावेळी त्यानं त्याची पार्टनर आरती ही आजारी आहे असा दावा केला. त्यानंतर पोलीस हॉटेलमध्ये आले. त्यांना आरती तिच्या रूममध्ये मृत आढळून आली.

त्यानंतर कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलं अन् मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं. त्यावेळी अतीरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. त्याचबरोबर महिलेच्या अनेक बरगड्या मोडल्याचं, फुफुस आणि यकृतात जखमा झाल्याचं देखील दिसून आलं. तिच्या छातीत आणि पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या जखमा निर्दयीपणे मारहाणीवेळी झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.

Crime News
Fadnavis On Uddhav Thackeray: माझ्या पोरानं हिंदूत्व चालवलं, वडिलांना अभिमान... आई-वडिलांवर घसरणाऱ्यांना फडणवीसांचा 'करारा जवाब'

विधावा आरतीसोबत प्रवीण रिलेशनशिपमध्ये

दरम्यान, पोलिसांना तपासावेळी आरती ही विधवा असून ती तिच्या १६ वर्षाच्या मुलासोबत गाझियाबाद इथं रहात होती. प्रवीण कुमार हा या कुटुंबाच्या परिचयाचा होता. तो आरतीचा मृत पती रोहित कुमारचा मित्र होता.

दरम्यान, एसीपी उपासना पांडे यांनी चौकशीदरम्यान कुमारनं तो गेल्या दीड वर्षापासून आरतीसोबत तो रिलेशनशीपमध्ये होता असं सांगितलं. ते एकमेकांना २०२२ पासून ओळखत होते.

प्रवीण कुमारनं चौकशीदरम्यन शनिवारी रात्री १० त्यांनी हॉटेलमध्ये चेक-इन केल्याचं सांगितलं. या दोघांनी मद्य प्राशन केलं होतं. रूम नंबर २०७ मध्ये बसून त्यांनी जेवण देखील केलं. मात्र त्यानंतर या दोघांमध्ये वादवादी झाली. प्रवीणला आरती ही दुसऱ्या एका पुरूषाच्या संपर्कात असल्याचा संशय होता.

Crime News
Donald Trump Iran Trade Tariff: ट्रॅम्प यांचा भारतावर अजून एक 'वार'... इराणशी व्यापार करणाऱ्यांवर २५ टक्के टॅरिफ

शाब्दिक वाद मारहाणीपर्यंत पोहचला

पोलिसांनी सांगितले की शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. कुमारच्या जबाबानुसार आरतीने त्याला कानाखाली मारली. त्यानंतर त्यानं आरतीला कोपर अन् बुक्क्यांनी मारहाण केली. आरतीनं स्वतःला वाचवण्यासाठी प्रवीणच्या चेहऱ्यावर नखांनी ओरखडे ओढले. त्यानंतर प्रवीणने आरतीच्या बडगड्यांवर सातत्यानं बुक्क्या आणि कोपरानं मारहाण केली.

प्रवीणनं हा हल्ला मध्यरात्री केला. पोलिसांनी सांगितलं की आरती बेशुद्ध झाली अन् बेडवर पडली. कुमारनं तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तो रूममध्येच बसून राहिला अन् नंतर आरतीच्या जवळ झोपी गेला.

Crime News
Latur crime news: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील रापका येथील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

प्रवीणला सकाळी जाग आली अन्....

त्यानंतर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कुमारला जाग आली अन् त्यानं पुन्हा आरतीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरती काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर प्रवीण कुमारने कोणालाही न सांगता हॉटेल सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला गेटवर थांबवलं. त्यावेळी त्यानं त्याची पार्टनर आजारी असल्यानं तो जवळच्या मेडिकलमध्ये चालला असल्याचं सांगितलं.

हॉटेल स्टाफने हॉटेल रूममध्ये जाऊन चेक केलं असता त्यांना महिला प्रतिसाद देत नसल्याचं जाणवलं. त्यानंतर त्यांनी कुमारला पोलिसांना कळवण्यास सांगितलं. सुरूवातीला प्रवीणनं मद्य प्राशन केल्यामुळं रात्री काय घडलं हे आठवत नसल्याचं सांगत होता. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या. प्रथमदर्शनी आरतीच्या शरिरावर कोणत्याच बाह्यजखमा नव्हत्या. त्यामुळं प्रवीणला वाटलं की त्यानं केलेली मारहाण ओळखून येणार नाही.

आता पोलिसांनी प्रवीण कुमार विरूद्ध भारतीय न्याय संहिता १०३ खुनाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी हॉटेल रूममधून पुरावे गोळा केले असून सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news