Devendra Fadnavis On Ajit Pawar: ...तर त्यांची जागा जेलमध्येच! नाही नाही म्हणत फडणवीसांनी अजितदादांच्या 'त्या' निर्णयावरून छेडलंच

Devendra Fadnavis PMC Election: अनाउन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं? फडणवीसांनी दादांच्या स्वप्नवत जाहीरनाम्याची हवाच काढली
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis pudhari photo
Published on
Updated on

Devendra Fdnavis On Ajit Pawar: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत ज्या ठिकाणी महायुती एकमेकाविरोधात लढत आहे तिथं एकमेकांवर टीका न करण्याचं ठरवलं होतं. मात्र अजित पवार यांनी पुणे महापालिका निवडणुकीचा प्रचार करताना भाजपवर टोकाची टीका केली होती. इतके दिवस संयम बाळगलेल्या फडणवीस यांनी अखेर अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. "घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं? किमान विश्वास बसेल असा तरी जाहीरनामा द्या," अशा शब्दांत फडणवीसांनी अजितदादांच्या मोफत प्रवास आणि मेट्रोच्या आश्वासनांचा समाचार घेतला. त्याचबरोबर त्यांनी गुन्हेगारांना तिकीट देण्यावरूनही अजित पवार यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis | पुढील पाच वर्षांत जळगाव ‘विकसित शहरांच्या’ श्रेणीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पवारांचा संयम ढासळला

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण वेगवेगळे लढत असताना 'मैत्रीपूर्ण लढत' देऊ आणि एकमेकांवर टीका टाळू, असा शब्द दिला होता. "मी आजवर संयम पाळला, पण निवडणुकीची परिस्थिती पाहून अजितदादांचा संयम आता ढासळलेला दिसतोय. ते आता बोलत आहेत, पण १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत," असा टोला फडणवीसांनी लगावला. अजित पवारांच्या 'माझं काम बोलतं' या विधानावरही त्यांनी खोचक टिप्पणी केली.

Devendra Fadnavis
Pimpri Chinchwad Free Metro PMPML: पिंपरी-चिंचवडकरांसाठी मेट्रो व पीएमपीएमएल प्रवास मोफत : अजित पवार

आपल्या बापाचं काय जातंय..?

अजित पवारांनी महिलांना बस आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवासाचे आश्वासन दिले होते. त्यावर फडणवीस उपरोधिकपणे म्हणाले, "मी सुद्धा आता अशी घोषणा करू शकतो की, पुण्याहून उडणाऱ्या विमानांत महिलांना तिकीट माफ असेल. अनाउन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं? पण लोकांना माहिती आहे की, हे आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा आपण निवडून येणार नाही हे ठाऊक असतं, तेव्हाच असे जाहीरनामे काढले जातात."

Devendra Fadnavis
Ajit Pawar Mahesh Landge Controversy: ७० हजार कोटींचा घोटाळा लपवण्यासाठीच अजित पवार भाजपात आले; महेश लांडगे यांचा घणाघात

..तर ते जेलमध्येच असतील

पुण्यातील गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरूनही फडणवीसांनी अजितदादांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ६० लाख पुणेकर असताना गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची गरज काय? "एकडे कोयता गँग संपवण्याची आणि पोलीस आयुक्तांवर कारवाईची भाषणे द्यायची आणि दुसरीकडे त्याच गुन्हेगारांना तिकीट देऊन त्यांचे समर्थन करायचे, हे अत्यंत चुकीचे आहे. लक्षात ठेवा, हे गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महानगरपालिका नसेल, तर ती जेलच असेल," असा कडक इशारा फडणवीसांनी दिला.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये आपलं काम बोलतंय; विरोधकांचा रागराग स्वाभाविक – फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्या या सडेतोड टीकेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुतीमधील 'मैत्रीपूर्ण' लढत आता संघर्षात बदलल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news