Parth Pawar Rajya Sabha oath: गॉड ब्लेस यू... वडिलांचा वारसा चांगला चालवाल! शपथविधीनंतर सभापती राधाकृष्णन यांनी दिले पार्थ पवारांना आशीर्वाद

दरम्यान, शपथविधीप्रसंगी पार्थ पवार हे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या लुकमध्ये दिसले.
parth pawar
parth pawarPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान, शपथविधीप्रसंगी पार्थ पवार हे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या लुकमध्ये दिसले. दरम्यान पार्थ पवार शपथविधी आटोपल्यानंतर राज्यसभा सभापती राधाकृष्णन यांना नमस्कार करायला गेले.

parth pawar
Kishori Pednekar: सचिव विभाग जर तुमची नजर फिरत नसेल, तर आम्ही फिरवून दाखवू; विरोधी पक्षनेत्या पेडणेकरांचा इशारा

यावेळी त्यांनी, तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन! तुम्ही तुमच्या वडिलांचा वारसा चांगल्या पद्धतीने चालवाल. गॉड ब्लेस यू... अशा शब्दांत पार्थ पवार यांना खास शुभेच्छा त्यांनी दिल्या.

पार्थ पवार शपथ घेताना राज्यसभेचे नेते आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, काँग्रेस नेते जयराम रमेश उपस्थित होते. तसेच पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते.

सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन

शपथविधी समारंभ आटोपल्यानंतर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री अनिल पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे हे सर्व नेते एकत्र असल्यामुळे गेल्या काही दिवसांत होत असलेल्या चर्चांना ब्रेक लागल्याचे आणि सर्व काही आलबेल असल्याचे दिसले. दरम्यान, पक्ष नेतृत्व येणार म्हणून तटकरे यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर सजावट करण्यात आली होती.

parth pawar
Gargai Water Project: गारगाई धरण पाणी प्रकल्पाच्या प्रस्तावावरून सभागृहात सत्ताधारी; विरोधक आमने सामने

पार्थ पवार प्रभावीपणे कार्य करतील : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. पार्थ पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. जनतेच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करताना ते लोकहित, विकास आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून संसदेत प्रभावीपणे कार्य करतील, अशी खात्री आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा अजित पवारांना समर्पित : पार्थ पवार

शपथ घेतल्यानंतर भावना व्यक्त करताना पार्थ पवार म्हणाले, आज माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. राज्यसभेचा सदस्य म्हणून शपथ घेताना मनात अनेक भावना दाटून आल्या. हा महत्त्वाचा टप्पा मी माझे स्वर्गीय वडील अजित पवार यांना समर्पित करतो. आज ते या क्षणाचे साक्षीदार असायला हवे होते. बारामतीतील जनतेचे मी विशेष आभार मानतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news