Gargai Water Project: गारगाई धरण पाणी प्रकल्पाच्या प्रस्तावावरून सभागृहात सत्ताधारी; विरोधक आमने सामने

सत्ताधाऱ्यांच्या संख्याबळामुळे प्रस्ताव मंजुर
Gargai Water Project
Gargai Water ProjectPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचा गारगाई धरण पाणी प्रकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुर झाल्यानंतर गुरुवार, ९ एप्रिल रोजी या प्रस्तावाची उपसूचनावर सभागृहात चर्चा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सभागृहात सत्ताधारी भाजपा सदस्य आणि विरोधक उबाठा, काॅंग्रेस पक्षातील नगरसेवक आमने सामने दिसून आले.

विरोधकांनी गारगाई प्रकल्प प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी धरून लावली. मात्र सत्ताधाऱ्यांनी संख्याबळावर सदर प्रस्ताव सभागृहात बहूमताने मंजुर केला. यामुळे आता गारगाई धरण पाणी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Gargai Water Project
Biotech Funding Issues: हाफकिनकडे संशोधनासाठी निधी नसल्याने रॉयल्टीचा घाट; 500 कोटी रुपयांच्या निधीची तातडीने गरज

गारगाई धरण पाणी प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी उबाठा पक्षाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी सभागृहात उपसूचना मांडली. यावेळी फणसे गारगाई धरण प्रकल्प एकूण ४४० एमएलडी पाणी मिळणार आहे. मात्र अजून केंद्र सरकारच्या दोन विभागाची परनागनी येणे बाकी आहे. ही परवानगी कंत्राटदारांनी घेवून यायची आहे.

या प्रकल्पाला किमान ६ वर्ष लागणार आहेत. ४०० एमएलडी पाणी सांडपाण्यातून मिळत असेल तर पहिला हा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी सर्वानी प्रयत्न केला पाहिजे. गारगाई प्रकल्पामध्ये अनेक त्रुटी आहेत. ३ लाख झाडे इतर ठिकाणी लावायची आहेत.

यामुळे सध्या तरी एवढ्या लवकर गारगाई प्रकल्प होवू शकणार नाही, असे म्हणत यासाठी ३ लाख १० हजार झाडांची कत्तल होणार आहे. अशाप्रकारे निसर्गाची कत्तल करून गारगाई प्रकल्प उभा करणार आहोत. मग एवढी घाई? आपण निर्सग ~हास करत आहोत. यामुळे सदर प्रस्ताव हा दफ्तरी दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.

याला प्रत्युत्तर म्हणून सभागृह नेता गणेश खणकर यांनी फणसे यांनी मांडलेल्या उपसूचना विरोध असल्याचे सांगितले. यावेळी खणकर यांनी शायरी मारत उबाठाच्या नगरसेवकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहातील उबाठाचे नगरसेवकांनी गोंधळ घातला. यापुढे खणकर म्हणाले, या सर्व नगरसेवकांना सकाळी पहिला फोन पाण्यासाठी येतो. ४६०० एमएलडी पाणी मुंबईकरांना मिळाली पाहिजे, ही गरज आहे.

ज्या दरामध्ये समुद्राचे पाणी स्वच्छ करण्याचे मागत आहे, मग तो प्रकल्प होवू द्या. मी मुंबईकरांसाठी याठिकाणी बसलो. तुमच्या काळात मध्य वैतरणा सुरु असे म्हणत, फणसे साहेब पर्यावरणाच्या चिंताविषयी मी तुमच्यासोबत आहे. परंतु कोस्टल रोडमुळे मुंबईतील वाहनाचे कार्बन ५३ टक्के कमी झाले. गारगाईसाठी राज्याचे अडथळे दूर झाले आहेत. आता केंद्राची परवानगी लवकर मिळवून देवू. हे पाणी मिळाल्यानंतर मुंबईची तहाण भागली जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

या उपसूचनेवर बोलतांना काॅंग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आझमी म्हणाले की, गारगाई धरणाचा प्रस्ताव २०२३ मध्ये मांडण्यात आला होता आणि त्याचा अंदाजित खर्च ३,३०० कोटी रुपये होता. धरण बांधण्यापूर्वी प्रशासनाने सहा गावांच्या स्थलांतरासह काही अटी ठेवल्या होत्या, परंतु हे स्थलांतर अद्याप झालेले नाही. कंत्राटदाराने कोणतेही काम सुरू केलेले नाही आणि तो आधीच २,००० कोटी रुपयांची मागणी करत आहे.

Gargai Water Project
Konkan AC special trains: कोकणसाठी धावणार 4 वातानुकूलित विशेष रेल्वे

हा प्रकल्प कधी सुरू होईल किंवा कधी संपेल याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कोणीतरी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांना भाषणाचे साहित्य देऊन बोलण्यास सांगितले. "यामागे सूत्रधार कोण आहे? कंत्राटदार दोन वर्षांनी परत येऊन आणखी २,००० कोटी रुपयांची मागणी करेल?" आझमींच्या भाषणादरम्यान भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी सभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर उत्तर देताना भाजपा नगरसेवक प्रवीण छेडा म्हणाले की, शिवसेनेने २०१३ मध्ये गारगाई धरणाचा प्रस्ताव मांडला होता आणि तो स्थायी समितीत मंजूर करून घेतला होता. आता त्याला विरोध करण्यात काही अर्थ नाही.

उबाठाच्या नगरसेविका विशाखा राऊत सभागृहात सत्ताधारी पक्षातील सदस्यांविरोधात आक्रमक होवून एका ठिकाणी आपण टॅकर मुक्त मुंबई करणार म्हणतात, तर मुंबईच्या सर्व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी वाहून नेण्यासाठी टॅकचराचा वापर? यासाठी पाईपलाईन का? नाही, गारगाई प्रकल्पात झाडांची कत्तल होणार आहे.

तुमच्या काळातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक कोटी झाडे कुठे लावली. असे नवथान बनला प्रतिउत्तर दिले. कोयना धरणातील लोकांचे अजून पुनर्वसन केले नाही. सभागृह नेते ऐकण्याची हिंमत धरा, पुनर्वसन लगेच होईल. ही तुमची धारणा आहे. असे ठणकावून सांगितले.

यानंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गारगाई प्रकल्पाचे यशोधर फणसे यांनी वास्तव दाखविले आहे. मुंबईकरांनीच आम्हाला निवडून आणले आहे. छेडाने जेडागिरी करू नये, यापुर्वी महापालिकेची स्वत:ची धरणे बांधली आहेत. गारगाई प्रकल्प एवढा सोपा नाही. आधी खारे पाणी गोड करू या प्रकल्पावर फोकस करावा.

उगाच शेट चिल्ली सारखे स्वप्न बघू नका. जे आपल्या हातात आहे. ते आधी करा. १०० वर्षांच्या झाडांवर कुऱ्हाड चावलून आपण आपली तहाण भागविणार आहोत? कमी पैसात चांगला प्रकल्प कसा देणार, याकडे सदस्यांनी फोकस द्यावा. यामुळे सदर प्रकल्प दफ्तरी दाखल करा, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.

पोलची विरोधकांची मागणी नामंजुर :-

गारगाई धरण प्रकल्पाला मंजुर कि नामंजुर यासाठी विरोधकांनी पोलद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली. परंतु महापौर रितू तावडे यांनी ती फेटाळून लावली. महापौर म्हणाल्या, हात वर करण्याआधी तुम्ही पोल घ्यायला होता. मी पोल म्हणाल्यावर तुमचे हात वर येत नाही. असे म्हणत महापौर तावडे यांनी

सत्ताधारी पक्षातील सदस्यांना अनुमोदन करण्यास सांगितले. यामध्ये नामंजुरमध्ये विरोधकांची संख्या कमी दिसून आले. तर मंजूरमध्ये सत्ताधारी सदस्यांनी केलेल्या हातची संख्या अधिक होती, या संख्येनुनार महापौर तावडे यांनी सदर प्रस्ताव मंजुर झाल्याचे सभागृहात जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news