लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ; दोन्ही सभागृह कामकाजाविना दुपारी २ पर्यंत तहकूब

Parliament Monsoon Session 2025 : विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
Parliament Monsoon Session 2025
Parliament Monsoon Session 2025 file photo
Published on
Updated on

Parliament Monsoon Session 2025

नवी दिल्ली : विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

राज्यसभेच्या अध्यक्षस्थानी असलेले भाजप खासदार घनश्याम तिवारी यांनी विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज स्थगित केले. यापूर्वी गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ पर्यंत स्थगित करण्यात आले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित केले.

Parliament Monsoon Session 2025
Supreme Court : मतदार यादींच्या SIR साठी ‘ही’ तीन ओळखपत्र वैध नाहीत! निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केलं स्पष्ट

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि इतर मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपला गोंधळ सुरूच ठेवल्याने अध्यक्षांनी कामकाज स्थगित केले. त्यांनी विरोधकांकडून सभागृहाच्या मध्यभागी फलक दाखवण्यावर आक्षेप घेतला. सभागृहात प्रश्नोत्तराचा तास चालू द्यावा, असे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सांगत होते, मात्र आंदोलन करणाऱ्या विरोधी सदस्यांनी लक्ष दिले नाही.

दरम्यान, 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी बिहारमधील मतदार याद्यांच्या (SIR) कार्यक्रमाविरोधात निदर्शने केली. या प्रक्रियेमुळे लोकांचे मतदानाचे हक्क हिरावून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी संसदेच्या मकरद्वाराजवळील पायऱ्यांवर उभे राहून बिहारमधील SIR प्रक्रियेला विरोध केला आणि ही प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news