

Pahalgam terror attack
दिल्ली : अटारी-वाघा सीमेवरील बंद दरवाजे अखेर खुले झाले आहेत. पाकिस्तान सरकारने शुक्रवारी हा निर्णय घेतला असून भारतात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे अल्पकालीन व्हिसा रद्द केले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे गुरुवारी पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांना घेण्यास नकार देत अटारी बॉर्डरचे दरवाजे बंद केले होते. आज भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परतण्याची परवानगी देऊन पाकिस्तानने अटारी-वाघा सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले. पाकिस्तानमध्ये सुमारे २४ तास शांतता पाळल्यानंतर हे पाऊल उचलले गेले. गुरुवारी सीमा बंद राहिली, ज्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक भारतीय बाजूला अडकले होते.
भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी दिलेली अंतिम मुदत ३० एप्रिल रोजी संपली. परंतु गरूवारी पाकिस्तानने गेट उघडले असते तर नागरिकांना पाठवले जाणार होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत लोकांना सीमेवर रोखून ठेवण्यात आले होते. पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवर वाट पाहत राहिले होते. पण पाकिस्तानी रेंजर्सनी गेट उघडून लोकांना घेऊन जाण्यास नकार दिल्याने संध्याकाळी सर्वजण परतले.
भारताने निवडक व्हिसा श्रेणी रद्द करण्याची घोषणा केल्यापासून, बुधवारी १२५ पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात गेले. ज्यामुळे सात दिवसांमध्ये बाहेर पडणाऱ्यांची संख्या ९११ झाली.