Pakistan Minister India Visit : पाकिस्तानी मंत्र्याला ताजमहाल भेटीची परवानगी, निजामुद्दीन दर्ग्याच्या भेटीला मात्र सुरक्षा यंत्रणांचा नकार

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) पहिल्या सभ्यता संवाद मंचासाठी भारतात दाखल
Taj Mahal
Taj Mahal Pudhari
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) पहिल्या सभ्यता संवाद मंचासाठी भारतात आलेले पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मसूद मलिक यांच्या दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मलिक यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळाला आग्रा येथील ताजमहालसह दिल्लीतील काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. मात्र, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्ग्याच्या भेटीला सुरक्षा यंत्रणांनी मंजुरी दिलेली नाही.

पाकिस्तानच्या उच्चायोगाने मलिक यांच्या दौऱ्यात ताजमहाल, हुमायूँची कबर, दिल्ली हाट आणि हजरत निजामुद्दीन दर्गा या ठिकाणांचा समावेश करण्याची विनंती केली होती. सुरक्षा यंत्रणांकडून आढावा घेतल्यानंतर पहिल्या चार ठिकाणांच्या भेटीला मंजुरी देण्यात आली. मात्र, निजामुद्दीन दर्ग्याच्या भेटीला परवानगी नाकारण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.