Kamala Pujari passed away | पद्मश्री पुरस्कारप्राप्त कमला पुजारी यांचे निधन

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
Kamala Pujari passed away
पद्मश्री पुरस्कारप्राप्त कमला पुजारी यांचे निधन file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि प्रसिद्ध सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी (Kamala Pujari) यांचे शनिवारी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांना किडनीशी संबंधित आजारामुळे दोन दिवसांपूर्वी कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

२०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

कोरापुर जिल्ह्यातील बैपरीगुडा तालुक्यातील पत्रपुट गावात कमला पुजारी (Kamala Pujari) यांचा जन्म झाला. त्या सेंद्रिय शेतीच्या समर्थक होत्या. त्यांनी विविध १०० प्रकारच्या भाताची लागवड केली होती. एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनशीही त्या संबंधित होत्या. २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१८ मध्ये त्या राज्य नियोजन मंडळाच्या सदस्या होत्या. २००४ मध्ये ओडिशा सरकारने त्यांना सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले होते. २००२ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे त्यांनी 'इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्ड'ही जिंकला होता.

Kamala Pujari passed away
Guru Pournima | तुम्ही देव पाहिलाय? - विवेकानंदांच्या प्रश्नावर त्यांच्या गुरूंनी दिले 'हे' उत्तर

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

कमला पुजारी यांच्या निधनावर (Kamala Pujari passed away) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीले की, 'जैवविविधतेचे संरक्षण करण्याचे कमला पुजारी यांचे कार्य वर्षानुवर्षे स्मरणात राहील. आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणातही त्या एक प्रकाशाचा किरण होत्या,' असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पुजारी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "ओडिशाच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि शेतकरी कमला पुजारी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दुःख झाले. भात आणि इतर पिकांच्या दुर्मिळ आणि लुप्तप्राय बियाण्यांच्या संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी शेतकऱ्यांमध्ये विशेषतः महिला शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले. सेंद्रिय शेती आणि पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील," असे मुर्मू यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news