Parliament Session 2024|NEET मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

राज्यसभेतही खडाजंगी
Parliament Session 2024
NEET मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्यागFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: अठराव्या लोकसभेच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या सत्राला आजपासून (दि.1 जुलै) सुरूवात झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कथित NEET-UG पेपर लीकवर एकदिवसीय चर्चेची मागणी केली. विरोधकांच्या या मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट नकार दिला. यानंतर विरोधकांनी सोमवारी (दि.१ जुलै)लोकसभेतून सभात्याग केला.

NEET मुद्द्यावरून राहुल गांधी आक्रमक

भाजप खासदार अनुराग ठाकूर आज (दि.१ जुलै) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडला. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा 'NEET' पेपरफुटीचा चर्चेचा मुद्दा संसद सभागृहात उपस्थित केला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, "आम्हाला NEET वर एक दिवसीय चर्चा हवी होती. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. ७० वेळा पेपर लीक झाल्या आहेत. तुम्ही या विषयावर स्वतंत्र चर्चेला परवानगी दिल्यास आम्हाला आनंद होईल," असेही राहुल गांधी म्हणाले.

Parliament Session 2024
NEET मुद्द्यावरून राहुल गांधी आक्रमक, सरकारकडे केली 'ही' मागणी

अध्यक्षांची इतर मुद्द्यावर चर्चेची सूचना

परंतु, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांची विनंती स्पष्टपणे नाकारली. पुढे त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मंजूर केल्यानंतर इतर मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात,असे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news