NEET मुद्द्यावरून राहुल गांधी आक्रमक, सरकारकडे केली 'ही' मागणी

NEET पेपरफुटी चर्चेच्या मुद्यावरून पुन्हा संसदेत गदारोळ
'NEET' मुद्द्यावरून राहुल गांधी आक्रमक, सरकारकडे केली 'ही' मागणी
'NEET' मुद्द्यावरून राहुल गांधी आक्रमक, सरकारकडे केली 'ही' मागणीFile Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: अठराव्या लोकसभेच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या सत्राला आजपासून (दि.1 जुलै) सुरूवात झाली. यावेळी सुरूवातीला भाजप खासदार अनुराग ठाकूर आज (दि.१ जुलै) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडला. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा 'NEET' पेपरफुटीचा चर्चेचा मुद्दा संसद सभागृहात उपस्थित केला.

आम्हाला विद्यार्थ्यांना संदेश द्यायचा आहे; राहुल गांधी

"संसदेतून देशाला संदेश दिला जातो. आम्हाला विद्यार्थ्यांना संदेश द्यायचा आहे की NEET हा मुद्दा संसदेसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा संदेश देण्यासाठी आम्हाला संसदेने यावर चर्चा करायला हवी आहे." असे म्हणत आज राहुल गांधी NEET मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झालेले दिसले. पुढे त्यांनी सभागृहात NEET मुद्द्यावरून चर्चेचीमागणी सरकारकडे केली आहे.

विरोधकांच्या NEET संदर्भातील मागणीवेळी राजनाथ सिंह यांचा हस्तक्षेप

लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणतात, "संसदेचे कामकाज काही नियम आणि परंपरांच्या आधारे चालते. मी विरोधकांना विनंती करतो की कोणतीही चर्चा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावानंतरच झाली पाहिजे."

यापूर्वी देखील विरोधकांचा गदारोळ, संसद सभागृह तहकूब

यापूर्वी शुक्रवारी (दि.२८ जून) विरोधकांनी राष्ट्रपतींच्या भाषणावर आभार प्रस्ताव सुरू असतानाचे NEET मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ घातला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आजपर्यंत (दि.१ जुलै) लोकसभा सभागृह तहकुब केले.

ED, CBI विरोधी इंडिया आघाडीची संसदेबाहेर निदर्शने

विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. दरम्यान संसद सभागृहाच्या सत्रादरम्यान विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीने तपास यंत्रणा ईडी, सीबीआय विरोधी आज (दि.१ जुलै) संसदेबाहेर जोरदार निदर्शने केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news