पंतप्रधान मोदी पाकिस्तानवरील भारताच्या हवाई हल्ल्यावर सतत लक्ष ठेवून होते, डोवाल देत हाेते प्रत्येक क्षणाचे अपडेट, एअर स्‍ट्राईकवेळी नेमकं काय घडलं?

Operation Sindoor : जम्‍मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याचा भारताने प्रतिहल्‍ला करून आज जोरदार प्रत्‍युत्तर दिले आहे.
Operation Sindoor
Operation Sindoor : पंतप्रधान मोदी पाकिस्तानवरील भारताच्या हवाई हल्ल्यावर सतत लक्ष ठेवून होते, डोवाल देत हाेते प्रत्येक क्षणाचे अपडेट, एअर स्‍ट्राईकवेळी नेमकं काय घडलं?File Photo
Published on
Updated on

operation sindoor pm narendra modi continuously monitoring nsa ajit doval

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

PM Modi Monitoring Operation Sindoor: भारताने पाकिस्‍तानवर केलेल्‍या एअर स्‍ट्राईकचे पंतप्रधान मोदी हे मॉनिटरींग करत होते. यावेळी त्‍यांच्यासोबत अजित डोवालही उपस्‍थित होते. ते पीएम मोदी यांना प्रत्‍येक वेळेची अपडेट देत होते.

Operation Sindoor
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला; भारताकडून ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानमधील ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक

जम्‍मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याचा भारताने प्रतिहल्‍ला करून आज जोरदार प्रत्‍युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्‍तान आणि पाकिस्‍तान व्याप्त काश्मीरमध्ये असलेल्‍या दहशतवादी तळ अचूक टिपून सुनियोजित पद्धतीने भारताने आज पहाटे एअर स्‍ट्राईक केला. यामध्ये पाकिस्‍तानातील ९ ठिकाणी हल्‍ले करून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्‍त करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ कल्‍याण मार्ग येथून या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. NSA अजीत डोभाल हे त्‍यांना प्रत्‍येक क्षणाची माहिती देत होते. आज सकाळी जवळपास १०:३० वाजता या मोहिमेविषयी पत्रकार परिषद घेउन देशाला माहिती दिली.

Operation Sindoor
Operation Sindoor : 'दहशतवादाशी झिरो टाेलरन्स..',पाकिस्तानमधील भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर जयशंकर यांची पहिली प्रतिक्रिया

नेत्‍यांनी केले कौतुक

ज्या ठिकाणी हल्ले झाले त्यात कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबाद यांचा समावेश आहे. लष्कराच्या या कारवाईनंतर देशभरातील नेत्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले.

Operation Sindoor
Operation Sindoor : हल्ल्यानंतर बघ्याची भूमिका घेणं अशक्य होते : शरद पवार

'भारत माता की जय'

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत माता की जय' लिहून सैन्याला सलाम केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिले, 'जय हिंद, जय हिंद की सेना.' केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'भारत माता की जय.'

विरोधी पक्षाचे नेतेही सरकार आणि लष्करासोबत उभे असल्याचे दिसून आले. राजद नेते तेजस्वी यादव यांनी हिंदीत लिहिले, 'दहशतवाद आणि फुटीरतावाद दोन्हीही होऊ नयेत!' आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही भारतीय सैन्याचे कौतुक केले आणि लिहिले की, 'दहशतवाद मुळापासून उखडून टाकला पाहिजे. आज रात्री झालेले हल्ले अचूक होते आणि दहशतवाद फोफावणाऱ्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. त्याला इतके जोरात मारा की त्याला पुन्हा डोके वर काढण्याची हिंमत होणार नाही. जय हिंद!

भारतीय लष्कराचे निवेदन

एका अधिकृत निवेदनात, भारतीय लष्कराने म्हटले आहे की, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoJK) मधील ज्या दहशतवादी तळांवरून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखली गेली आणि ती अंमलात आणली गेली, त्यांना लक्ष्य करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, 'आमच्या कृती अचूक होत्‍या. या हल्ल्यांमध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलेले नाही. भारताने लक्ष्य निवड आणि कृती पद्धतीमध्ये खूप संयम दाखवला आहे. सैन्याने स्‍पष्‍ट केले आहे की, ही कारवाई नुकत्‍याच पहलगाम हल्‍ल्‍याच्या प्रत्‍युत्तरादाखल करण्यात आली आहे. या हल्‍ल्‍यात २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा जीव गेला होता. या हल्‍ल्‍यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. भारताने बुधवारी 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. या कारवाईत ३ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी असल्याचे वृत आहे. स्वतः पंतप्रधान मोदी या ऑपेरेशनवर जवळून लक्ष ठेवून होते.

पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी (दि.७) रात्री १.३० वाजता बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली, मुझफ्फराबाद यासह नऊ ठिकाणी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हल्ले करण्यात आले. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कर आणि जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० आणि सुखोई-३० एमकेआय सारख्या प्रगत लढाऊ विमानांनी बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद भागांना लक्ष्य करत ती उद्ध्वस्त केली. हे भाग बऱ्याच काळापासून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जातात.

भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील या ९ ठिकाणांना केले लक्ष्य

1. बहावलपुर,

2. मुरीदके,

3. गुलपुर,

4. भीमबर,

5. चक अमरू

6. बाग

7. कोटली,

8. सियालकोट

9. मुजफ्फराबाद

'भारताने ६ ठिकाणांवर २४ हल्ले केले : पाकिस्तानी लष्कराचा दावा

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचेही विधान समोर आले आहे. पाक सैन्याने सांगितले की, ६ ठिकाणी २४ हल्ले करण्यात आले. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३३ जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताने हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तान खडबडून झाले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सर्व शाळा व महाविद्यालये बुधवारी (दि.७) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सकाळी १०:३० वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे.

भारत माता की जय : रक्षा मंत्री राजनाथ सिंह

भारताने सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी छावण्या उद्वस्त केल्या. या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियाच्या X प्लटफॉमवर 'भारत माता की जय' असे लिहत भारतीय जवानांचे मनोबल वाढवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news