'लाडकी बहीण' योजनेसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज घेणार

दिरंगाई, अडवणूक, पैशांची मागणी होता कामा नये : जिल्हाधिकारी
Ladki Bahin Yojana
'लाडकी बहीण' योजनेसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज घेणारfile photo
Published on
Updated on

कोल्हापूर : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी महानगरपालिका, नगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात व प्रत्येक गावात उद्यापासून ऑनलाईन अर्ज दाखल होण्यासाठी चोख नियोजन करा. या योजनेच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील, असे काम करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

निःशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय

या योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरून घेणे आदी प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात महिलांची अडवणूक, दिरंगाई किंवा पैशांची मागणी होणार नाही, याची दक्षता घ्या, असे आदेशही त्यांनी बुधवारी दिले. या योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. येडगे म्हणाले, या योजनेसाठी 'नारी शक्ती दूत' अॅपवर निःशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा अर्ज भरून देण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची मदत घेऊ नका. कोणतीही अडचण आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.

Ladki Bahin Yojana
पंचगंगेची पाणीपातळी 25.11 फुटांवर

अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना ५० रुपये मानधन

योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रतिलाभार्थी ५० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

योजनेच्या माहितीसाठी प्रचार, प्रसिद्धी करा

या योजनेची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करा. तसेच कोणत्याही कार्यालयात या योजनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना योग्य ती माहिती द्यावी. दैनंदिन झालेल्या कामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती घावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. यांनी दिल्या. कागदपत्रे उपलब्ध करून घेण्यासाठी किंवा अर्जाच्या नोंदणीसाठी गर्दी होणार नाही, यादृष्टीने योग्य नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे आदी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news