पंचगंगेची पाणीपातळी 25.11 फुटांवर

बांबवडे, कसबा तारळे, पन्हाळा, कोतोली परिसरात अतिवृष्टी
Paleshwar Project
शाहूवाडी तालुक्यातील ठाणेवाडी येथील पालेश्वर प्रकल्प बुधवारी ओव्हर फ्लो झाला.Pudhari News Network

कोल्हापूर : शहरात जरी पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावासामुळे बुधवारी पंचगंगेच्या पाणीपातळी लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी सात वाजता 21 फूट 11 इंचावर असणारी पंचगंगेची पाणीपातळी 4 फुटांनी वाढून रात्री अकरा वाजता 25 फूट 11 इंचावर पोहोचली होती. गेल्या 24 तासांत कोल्हापुरात सरासरी 33.7 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक 74.4 मि. मी. पाऊस शाहूवाडी तालुक्यात झाला आहे. तर बांबवडे, कसबा तारळे, पन्हाळा, कोतोली परिसरात अतिवृष्टी झाली.

Paleshwar Project
Nashik News | मुसळधार पावसामुळे निवाने बारी घाटात कोसळली दरड

शहरात बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली होती. दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. मात्र, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. चंदगड तालुक्यातील कोवाड गावात लक्ष्मी कुंभार राहते. घर पूर्ण पडले असून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. याशिवाय शाहूवाडी, चंदगड तालुक्यात दोन व आजरा तालुक्यात एक अशा घराच्या पडझडीच्या घटना घडल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आहे.

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी 7.00 वाजता राजाराम बंधार्‍याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 21 फूट 11 इंचावर होती. त्यानंतर दुपारी 12 वाजता वाजता पाणी पातळी 23 फूटांवर पोहोचली होती. दुपारी 3 पाणीपातळीत वाढ होत पाणीपातळी 23 फूट 10 इंचावर पोहोटली होती. रात्री आठ वाजता पंचगंगेची पाणीपातळी 25.2 इंचावर पोहचली होती. गेल्या 24 तासांत शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे (130.5 मि.मी.), राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे (108 मि. मी.), पन्हाळा (90 मि.मी.), कोतोली (89.8 मि.मी.) परिसरात अतिवृष्टी झाली आहे.

राधानगरी धरणात 2.78 टीएमसी पाणीसाठा असून धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. बुधवारी सकाळी 7 वाजता शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच पावसाची तीव—ता कायम राहिल्यास प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याने शाळी नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच सायंकाळी 6 जांबरे मध्यम प्रकल्पाच्या विद्युत गृहातून 230 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आल्याने ताम—पर्णी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

साळगाव बंधार्‍यावर पुराचे पाणी येण्याची शक्यता

आजरा तालुक्यातील पावसाचे प्रमाण पहाता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 58 वरील साळगाव बंधार्‍यावर पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेटिंग लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. आजार्‍याहून पेरणोली मार्गे गारगोटी जाणार्‍या या रस्त्याला सोहाळे मार्गे पर्यायी रस्ता आहे.

पालेश्वर लघु मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर लघु मध्यम प्रकल्प बुधवारी ओव्हर फ्लो झाला. कडवी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 55 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली. पालेश्वर धरणाची पाणी साठवण क्षमता 8.79 दलघमी इतकी आहे. सांडव्यातून पाणी प्रवाहित झाल्याने पालेश्वर धबधबा कोसळू लागला आहे.

Paleshwar Project
Weather Update : पुढील 5 दिवस देशभर अतिवृष्टी!

वारणा नदी पात्रा बाहेर

वारणानगर : वारणा नदीचे पाणी बुधवारी पात्राबाहेर पडले. कोल्हापूर-सांगली जिल्हा जोडणार्‍या वारणानगर - चिकुर्डे मुख्य मार्गावर असणार्‍या वारणा नदीवरील चिकुर्डे बंधार्‍याला बुधवारी दिवसभर नदीचे पाणी घासून जात आहे. बुधवारी दिवसभर पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. सांयकाळी वारणा नदीपात्राचे पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news