ONGC Apprentice Recruitment 2025: परीक्षा न देता सरकारी नोकरी! ONGC मध्ये 2623 पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा?

ONGC Apprentice Recruitment 2025: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. 'ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड' ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
ONGC Apprentice Recruitment 2025
ONGC Apprentice Recruitment 2025file photo
Published on
Updated on

ONGC Apprentice Recruitment 2025

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड' (ONGC) ने विविध पदांसाठी शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. देशभरात एकूण २,६२३ रिक्त पदांसाठी ही भरती होणार असून, उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेविना केवळ मुलाखतीच्या आधारावर केली जाईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

शैक्षणिक पात्रता

ओएनजीसीने विविध क्षेत्रांमध्ये ही भरती काढली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमाची पदवी असणे आवश्यक आहे, तसेच काही पदांसाठी ३ वर्षांच्या इंजिनीअरिंग डिप्लोमाची अट आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी, कारण काही पदांसाठी आयटीआय/१०वी/१२वी/पदवीधारक देखील पात्र असू शकतात.

ONGC Apprentice Recruitment 2025
Bengaluru student rape: इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिनिअर विद्यार्थीनीवर बलात्कार; नराधम आरोपीने नंतर विचारले, 'गर्भपाताची गोळी हवी आहे का?'

या पदांसाठी होणार भरती

या अप्रेंटिसशिप अंतर्गत खालील पदांसाठी उमेदवार निवडले जातील:

  • लायब्ररी असिस्टंट

  • फायर सेफ्टी टेक्निशियन

  • लॅब केमिस्ट / अनालिस्ट (पेट्रोलियम प्रॉडक्ट्स)

  • अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह

  • कॉम्प्युटर सायन्स एक्झिक्युटिव्ह

  • HR एक्झिक्युटिव्ह

  • COPA (कंप्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट)

  • इलेक्ट्रीशियन, फिटर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल)

  • इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक

वयोमर्यादा कीती?

  • किमान वय: १८ वर्षे

  • जास्तीत जास्त वय: २४ वर्षे

  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सवलत देण्यात आली आहे:

  • एससी/एसटी: ५ वर्षांची सूट (जास्तीत जास्त २९ वर्षे)

  • ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर): ३ वर्षांची सूट (जास्तीत जास्त २७ वर्षे)

  • दिव्यांग व्यक्ती: १० वर्षांची सूट (जास्तीत जास्त ३४ वर्षे)

ONGC Apprentice Recruitment 2025
Nagpur cricket accident: क्रिकेट खेळताना दुर्देवी घटना! बॉल अवघड जागी लागल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

निवड कशी होणार?

या भरती प्रक्रियेत उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. निवड प्रामुख्याने उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळवलेल्या गुणांवर आधारित 'गुणवत्ता यादी' आणि त्यानंतर मुलाखती द्वारे केली जाईल.

नोंदणी प्रक्रिया १६ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. निकाल २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला जाईल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ओएनजीसीच्या nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला किंवा www.apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या.

  • मुखपृष्ठावरील भरती विभागात क्लिक करा.

  • आता "ऑनलाइन अर्ज करा" वर क्लिक करा.

  • फॉर्मवर आवश्यक माहिती भरा.

  • आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

  • तुमच्या श्रेणीनुसार शुल्क भरा.

  • अर्ज भरल्यानंतर, ते सबमिट करा.

  • फॉर्मची प्रिंट काढून घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news