Manmohan Singh | मनमोहन सिंग यांची 'त्या' पत्रकार परिषदेतील टिप्पणी दशकभरात चर्चेत

Manmohan Singh | ०३ जानेवारी २०१४ रोजी पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी शेवटची पत्रकार परिषद घेतली होती.
Manmohan Singh Passes Away
माजी पंतप्रधान मनमोहन सिंगPudhari File Photo
Published on
Updated on

प्रथमेश तेलंग

०३ जानेवारी २०१४ रोजी पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी शेवटची पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी केलेली टिप्पणी गेल्या दशकात सोशल मीडियावर अनेक वेळा चर्चेत आली आहे.

त्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने डॉ. सिंह यांना त्यांच्या स्वत:च्या मंत्र्यांवर लगाम घालण्यास असमर्थता आणि अनेक परिस्थितींमध्ये त्यांनी काम करण्यास नकार दिल्याबद्दल विचारले होते.

यावर प्रत्युत्तर देताना डॉ सिंह हसतमुखाने म्हणाले होते, "माझा प्रामाणिकपणे विश्वास आहे की, समकालीन माध्यमांपेक्षा किंवा संसदेतील विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्यासाठी अधिक दयाळू असेल.

" सरकारच्या कॅबिनेट व्यवस्थेत घडणाऱ्या सर्व गोष्टी मी सांगू शकत नाही. मला वाटते की आघाडीच्या राजकारणाची परिस्थिती आणि मजबुरी लक्षात घेऊन, मी त्या परिस्थितीत जेवढे करू शकलो ते मी केले आहे, असे ते म्हणाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news